Ads

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची IPL क्रिकेट सट्टेबाजांवर धडक कार्यवाही

चंद्रपुर :-सद्या सुरू असलेल्या IPI. क्रिकेट वर मोठया प्रमाणात सटटा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करन्याचे मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर यांनी निर्देश दील्याने विशेष मोहीम राबवुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी / कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवून कार्यवाही करत..Local crime branch Chandrapur has taken action against IPL cricket bookies

पो.स्टे पडोली हद्दीतील यशवंतनगर येथे MH-34 पानठेला येथे जुगल हिरालाल लोया हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) सनराईज हैद्राबाद विरुद्ध लखना सुपर जायटस क्रिकेट या IPI. क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी सदर इसम मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहुन IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळून आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण १२,०१०/- रु. चा माल जप्त करण्यात आला असून सटटेबाज नामे १) जुगल हिरालाल लोया वय ४८ वर्ष रा यशवंत नगर हनुमान मंदिरजवळ पडोली जि. चंद्रपुर २) पाहिजे आरोपी नामे पारस उड़ाक रा. चंद्रपुर यांचे विरूध पो.स्टे पडोली येथे अप.क. ७० / २०२३ कलम १२ (अ) म. जु.का, सहकलम १०९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो. स्टे पडोली करित आहे.

तसेच पो.स्टे रामनगर हद्दीतील रयतवारी कॉलरी चंद्रपुर येथील सि.आर.सि ग्राउन्डचे गेटसमोरयेथे सिध्दार्थ राजकुमार कुरमी हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) सनराईज हैद्राबाद विरुद्ध लखनौ सुपर जायटस क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मंचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी सदर इसम मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहून IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण १७,८१० /- रू. चा माल जात करण्यात आला असुन सटटेबाज नामे सिध्दार्थ राजकुमार कुरमी वय २५ वर्ष रा. रयतवारी कॉलरी बि.एम. टि. चौक चंद्रपुर यांचे विरूद्ध पो स्टे रामनगर येथे अप. क. ३४९/२०२३ कलम १२ (अ) म जु. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो स्टे रामनगर करित आहे.

तसेच पो.स्टे भद्रावती हद्दीतील एकता नगर चारगाव येथील मंगेश दुरुडकर हा इंडियन प्रिमीयर लीग ( IPL-2023) सनराईज हैद्राबाद विरूध्द लखनी सुपर जायटस क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी सदर इसम मोबाईलवर संभाषण व मेसेज करून, लॅपटॉप व नोंदवही वर आकडे लिहुन IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन ४ मोबाईल, लॅपटॉप नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण ६३,५५० /- रू चा माल जप्त करण्यात आला असून सटटेबाज नामें मंगेश अरुन दुरुडकर, वय ३२ वर्ष रा. एकता नगर वेकोली वसाहत भद्रावती जि.चंद्रपुर यांचे विरूध पो.स्टे भद्रावती येथे अप क.. १५८ / २०२३ कलम ४,५ म. जु. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो.स्टे भद्रावती करित आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर सपोनी मंगेश भोयर, पो.उप.नि. अतुल कावळे, पो.हवा. संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, वनराज करकाडे, नापोकों संतोष येलपुलवार, गजानन नागरे, पोकों नितीन रायपुरे, गोपाल आतंकुलवार, नरेश डाहुले, कुंदन बावरी, रविंद्र पधरे, अजय बागेसर, संदीप मुळे, प्रशांत नागोसे चालक नागोशी चंद्रशेखर आसुटकर यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे..


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment