चंद्रपुर : नगरपरिषद राजुरा मार्फत आपण घोषित करत आहोत की, राजुरा शहर स्वच्छतेबाबत आपण आपल्या आरोग्य व स्वच्छता विभागामार्फत दररोज शहर सफाई आणि वर्षभर स्वच्छते संबंधी इतर जनजागृती उपक्रम शहरात राबवत असतो ,मात्र महात्मा गांधी यांच्या Be The Change You Want To See
या संकल्पनेवर आधारित आपण स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून म्हणजे नगरपरिषदेच्या कार्यालयापासून करण्याचे ठरविले आहे ,सदर उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सहा बाबींच्या समावेश आहे प्रथम नगरपरिषद चे सर्व कर्मचारी व अधिकारी स्वतःचे कार्यालय व बसण्याची जागा स्वच्छ व साफ करतील तदनंतर इमारतीस बाहेरून रंगकाम टाकाऊ पासून टिकाऊ उपक्रमा अंतर्गत टेंभी मार्गावर रेलिंग दुरुस्ती व या मार्गावर वाहनांच्या शिरकाव रोखण्यासाठी प्रवेशद्वार तसेच नगरपरिषद कडे ध्वज स्तंभाकडून जाणारा पोहोच रस्ता तयार करणे, तलावातील इकोर्निया काढणे समाज कंठकाकडून मोडतोड करण्यात आलेले आय लव राजुरा दुरुस्त करणे, कार्यालयाच्या गच्चीवर बाग आणि कर्मचाऱ्यांना डब्बा खाण्यासाठी जागा तयार करणे ,नगरपरिषद इमारती भोवतीचे सर्व भंगार लिलाव करून विकून टाकणेइत्यादी कामाच्या समावेश आहे, त्याचप्रमाणे सदर उपक्रमांतर्गत सर्व विभाग प्रमुख मिळून गच्चीवरील बाग उपक्रमासाठी 50 नग सिमेंट कुंड्या रोपा सह स्वखर्चाने देणार असून त्यावर प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांचे नाव लिहिले असेल व त्यांची संगोपन करण्याची जबाबदारी संबंधितावर असेल असे निर्देश देण्यात आले आहे, याप्रमाणे कामे विभाग प्रमुखांनी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी करणे करिता त्यांना दिलेले काम प्रत्यक्ष स्वरूप ते पूर्ण करीत आहेत व सर्वांना कार्यालयात पाहायला सुद्धा मिळेल, अशाच प्रकारे राजुरा शहरातील जनतेने सुद्धा स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करून राजुरा शहर स्वच्छ शहर सुंदर शहर करण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषद चे मुख्याधिकारी तथा प्रशासन डॉक्टर सुरज जाधव यांनी केले आहे,
0 comments:
Post a Comment