Ads

क्रीष्णा अपार्टमेंट मधील खोलीत आढळला युवतीचा अर्धनग्न मृतदेह

चंद्रपुर : वणी घुग्गुस मार्गावरील शिव मंदिरापासून जवळच असलेल्या क्रिष्णा अपार्टमेंट मधील एका खोलीत चोवीस वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. आज 29 मे ला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या युवतीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रूम मधून दुर्गंधी येऊ लागल्याने घर मालकाने याबाबत पोलीसांना माहिती दिली.A half-naked body of a young woman was found in a room in Krishna Apartment
पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीची पाहणी केली असता ही खळबळजनक घटना उघडकीस आली. आरोही वैभव बारस्कर (२४) व आरोही वानखडे अशी दोन नावे असलेली आधारकार्ड मृतक युवती जवळ आढळून आल्याने तिचे माहेरचे नाव कोणते व सासरचे कोणते हा संभ्रम निर्माण झाला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतरच तिच्या नावाची स्पष्टता होईल. ही युवती वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील निंबी या गावची रहिवासी असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. युवतीचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment