Ads

रायगडावरील पवित्र माती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार यांनी दिली सुधीर मुनगंटीवार यांना भेट.

भद्रावती तालुका प्रतिनिधी
जावेद शेख:भद्रावती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावर यांनी रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरची पवित्र माती एका कलशामध्ये आणून या पवित्र मातीचा कलश चंद्रपूर येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा संघटक बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वने, मत्स्यव्यवसाय आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेट दिली.
Holy soil at Raigad
BJP State Vice President Amit Gundawar met Sudhir Mungantiwar.
या रायगड भेटीने आपल्यात नवचैतन्य निर्माण झाल्याचे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार यांनी सांगितले. पुणे येथील पार पडलेल्या भाजयुमोच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अमित गुंडावर गेले असता भाजपचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे तथा शहरातील प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली. व छत्रपतींच्या पावन स्मृतींचे दर्शन घेतले. यावेळी छत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुणीत झालेली रायगड किल्ल्यावरील पवित्र माती एका कलशात त्यांनी भद्रावती येथे आणली व चंद्रपूर येथे पार पडलेल्या भाजपच्या जिल्हा संघटक बैठकीत नामदार सुधीर मुनगंटीवार यांना हि पवित्र माती असलेला कलश भेट दिला. यावेळी जय भवानी जय शिवाजी या नाऱ्याच्या निनादात ही पवित्र माती नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वीकार
ली. या बैठकीला देवराव भोंगळे, चंद्रकांत गुंडावार व जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी गेले असता अमित गुंडावर यांनी शिवाजी महाराजांच्या आठवणी जवळून अनुभवल्या .येथे महाराज शेवटचा क्षण निजले, जेथे ते जेवण करीत होते, राज दरबार ज्या ठिकाणी व्हायचा, सचिवालय ,बाजारपेठ, महत्त्वाची टाकसाळ,रायरेश्वर महादेव मंदिर, शिवाजी महाराजांची समाधी, हिरकणी बुरुज, होळी मैदान, साक्षात शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक स्थळ या गोष्टी पाहण्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment