भद्रावती जावेद शेख तालुका प्रतिनिधी : भ्रमणध्वनी मुळे आजची पिढी ही मैदानी खेळापासून दूर गेली आहे. कमी वयात आज या पिढीला विविध आजाराने आणि नैराश्याने ग्रासले आहे. निरोगी आणि दीर्घायुष्य जीवन जगण्याकरिता मैदानी खेळ, योग करणे गरजेचे आहे आज मी ८६ वर्षाचा असून सुद्धा निरोगी आहे. याचे श्रेय दैनंदिन व्यायामास जाते. असे उद्गार जल योग तथा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त कृष्णाजी नागपूरे यांनी बाल संस्कार शिबिरात काढले.Today's generation is away from outdoor sports due to mobile phones
श्री साई बहुउद्देशीय कला व
शिक्षण संस्थेच्या वतीने उन्हाळी बालकुमार संस्कार शिबिराचा एक भाग म्हणून श्री बालाजी वाटर पार्क व कृषी पर्यटन स्थळात जल योगतज्ञ कृष्णाजी नागपुरे यांचे जलयोग प्रात्यक्षिक पार पडले. त्यावेळी त्यांनी उपस्थित पालक आणि शिबीरार्थी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती स्काय वॉच ग्रुपचे प्रा. डॉक्टर योगेश दुधपाचारे, सचिन बहादे,नगरसेवक नरेंद्र पढाल, पत्रकार दिलीप ठेंगे, मच्छीमार संस्थेचे संचालक दिलीप मांढरे, मनोहर नागपुरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश नागपुरे, वॉटर पार्कचे संचालक भारत नागपुरे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
संचालन संस्थेचे क्षितीज शिवरकर, प्रास्ताविक प्रा. अर्चना डोंगरे तर आभार प्रदर्शन शालिक दानव यांनी केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे योग जलतज्ञ कृष्णाजी नागपुरे यांनी नंतर उपस्थितांना पाण्यातील विविध प्रकारचे जलयोग प्रात्यक्षिक करून दाखविले. या वयात त्यांच्या उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले. या जल योगाचे संचालन प्रा. अर्चना डोंगरे ,प्रा.फुलझेले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे विनोद ठमके, सचिन बेरडे, स्नेहा ठमके,सारिका तलमले, उषा दाते, अनंता मत्ते, हर्षदा हिरादेवे आदींनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment