Ads

राजीवजी गांधी यांच्यामुळे देशात तंत्रज्ञान क्रांती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचे प्रतिपादन

चंद्रपूर : देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांनी देशात तंत्रज्ञान क्रांती व्हावी यासाठी पुढाकार घेतला. या तंत्रज्ञान क्रांतीमुळेच आजघडीला शहरांपासून गावखेड्यापर्यंत संगणक व त्याचा वापर होताना दिसत आहे. देशात तंत्रज्ञान क्रांती घडविण्यात राजीवजी गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर शहर-ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले.Technological revolution in the country due to Rajivji Gandhi
Assertion of Congress District President Ritesh (Ramu) Tiwari

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात रविवारी (ता. २०) राजीवजी गांधी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात रितेश (रामू) तिवारी बोलत होते. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राजीवजी गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, चंद्रपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदाताई वैरागडे, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी प्राचार्य नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, निशा धोंगडे, बापू अन्सारी, राजेश वर्मा, सागर खोब्रागडे, तवंगर खान, एजाज भाई, पप्पू सिद्दीकी, राजवीर यादव, कासिफ अली, विनीत डोंगरे, यश दत्तात्रय, वीर यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment