भद्रावती (जावेद शेख): केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) "मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर") "My Life My Clean City"हे अभियान दिनांक 15/05/2023 पासून पुढील 3 आठवड्यांच्या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाना RRR (रिड्यूस रीयुज आणि रिसायकल) केंद्र स्थापन करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. Give what is unnecessary.. Take what is necessary.. Initiative of Nagar Parishad Bhadravati
शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी रिड्यूस रीयुज आणि रिसायकल सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नुतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मुळ उद्देश्य आहे. त्यानुसार RRR (रिड्यूस रीयुज आणि रिसायकल) केंद्र स्थापन करण्याबाबत प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने भद्रावती शहरात सुरु असलेल्या जनकल्याण उपजीविका केंद्राजवळील कपडा, शूज बैंक व बुक बैंक ला अद्यावत करून तेथे RRR (रिड्यूस रीयूज आणि रिसायकल) केंद्र प्रस्थापित करण्यात आलेले असून आज दिनांक 19/05/2023 रोज शुक्रवार ला RRR (रिड्यूस रीयुज आणि रिसायकल) केंद्राचे उद्घाटन नगर परिषदे भद्रावतीचे नगराध्यक्ष मा. अनिलभाऊ धानोरकर, यांनी केले या प्रसंगी मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, नगरसेवक श्री प्रफुल चटकी, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता श्री निलेश रासेकर, कर निरीक्षक व प्रशासकीय सेवा श्री रविंद्र गड्डमवार व इतर कर्मचारी तसेच भद्रावती शहरातील नागरिक उपस्थीत होते.
दरम्यान नगर परिषदे भद्रावतीचे नगराध्यक्ष मा. अनिलभाऊ धानोरकर यांनी RRR (रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल) केंद्राबाबत उपस्थितांना माहिती दिली तसेच भद्रावती शहरात मागील 1 वर्षापासून जनकल्याण कपड़ा बैंक, शूज बैंक व बुक बैंक या उपक्रमास सुरुवात करण्यात आली होती त्यात 1 वर्षात 4060 लोकांनी याचा लाभ घेतला असून भद्रावती शहरातील सर्व नागरिकांना आव्हान केले की, वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रात आणून द्यावीत.
0 comments:
Post a Comment