Ads

माजरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई – 46 हजार रुपयांची अवैध देशी दारू जप्त

जावेद शेख /भद्रावती, दि. 24 ऑक्टोबर :
पोलीस स्टेशन माजरी हद्दीत आज अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करून एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Majri Police forceful action – 46 thousand rupees worth of illegal country liquor seized
creat image with country liquor & indian police with one acusse
गोपनीय माहितीच्या आधारे मटण मार्केट, माजरी येथे छापा टाकण्यात आला असता, आरोपी वैभव कुशाब साव (रा. माजरी) हा देशी दारूची अवैध वाहतूक करीत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 400 नग देशी दारूच्या बाटल्या (की. 16,000/- रु.) व मोटारसायकल (की. 30,000/- रु.) असा एकूण 46,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चौकशीत आरोपीने सदर माल हा विलास भोंगळे (रा. वरोरा) याचा असल्याचे सांगितले. आरोपी देशी दारूचा माल भोंगळे अँड सन्स दारू भट्टीकडे घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाल्याने विलास भोंगळे याच्यावर कलम 65(अ), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. पांडे, सपोनि. धागडे, ग्रेट पो.उपनि. मनोहर दडमल, पो.अ. अनिस शेख, प्रमोद मिळमिले, रवी कन्नाके यांनी केली असून तपास फौजदार रमेश तुरानकर करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment