जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :- येथील संताजी नगर प्रकल्पासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्राचे सचिव इम्रान खान यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून डांबरीकरणासाठी २२ लाख ५५ हजार रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.
BJP Yuva Morcha Imran Khan's Pathpurava Yashasvi; 22.55 lakh rupees fund sanctioned for damming Santaji Nagar roads under Bhadravati..!
या निधीचा उपयोग महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना २०२५-२०२६ अंतर्गत संताजी नगरातील रस्त्यांच्या दर्जेदार डांबरीकरणासाठी होणार असून, यामुळे परिसरातील पायाभूत सुविधा सुधारतील आणि नागरिकांना समाधानही मिळणार आहे.
तसेच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश सचिव इम्रान खान यांच्या अथक प्रयत्नांमुळे भद्रावती नगरपरिषदेच्या संताजी नगर प्रभाग क्रमांक १ मधील शासनाकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीचा उपयोग मुख्यत्वे संताजी नगरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे विशेष आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना २०२५-२०२६ अंतर्गत मंजूर झालेला निधी २२ लाख ५५ हजार रुपये आहे.
हा पाठपुरावा आठवड्यातील उच्चस्तरीय बैठकीत निश्चित केला गेला.
इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद, शासन व विविध पातळ्यांवर प्रकल्पाबाबत पाठपुरावा केला.
शासकीय कामगिरीचे बारकावे घेत, दर्जेदार विकासासाठी त्यांचे प्रयत्न सतत चालू राहिले, ज्यामुळे नागरिकांच्या हितासाठी निधी मिळवण्यात यश मिळाले. संताजी नगर परिसरातील नागरिकांच्या गटार, पाणीपुरवठा, सॅनिटेशनसह प्राथमिक सुविधा या प्रकल्पाद्वारे अधिकाधिक सुधारण्याचा विचार केला जात आहे.
तसेच, या प्रकल्पामुळे पावसाळ्यात चिखल आणि धुळीचा त्रास कमी होण्यास मदत होईल, तसेच येणे -जानेच्या त्रास (दळणवळण) लवकर होण्याची येथील सुध्न नागरिकांकडून मत व्यक्त होत आहे.
दरम्यान आ. देवतळे यांचा उल्लेखनीय प्रयत्नांमुळेच भाजप युवा मोर्चा सचिव इम्रान खान यांच्या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांनी उच्च प्रशंसा केली आहे.
तसेच विकासात्मक पुढाकार हा युवा मोर्च्याच्या आघाडीवरून मिळालेल्या प्रतिक्रियेत संताजी नगरमधील युवक प्रमुखांनी “आमदारांसह सहभागातून आपल्या क्षेत्राचा संपूर्ण विकास घडणार आहे; भविष्यात अशा योजनांवर आमचा सतत पाठपुरावा राहील” असे मत इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.
या निधीमुळे नगरपरिषद भद्रावतीतील सोयीस्कर सुविधा सुधारण्यास मोठा मार्ग खुला झाला आहे.
ज्या नागरिकांना मानसिक समाधान लाभेल, हा नीधी मंजूर होताच
स्थानिक प्रशासनानेही युवक मोर्च्याच्या आग्रहाप्रमाणे या प्रकल्पात गुणवत्तापूर्ण कामकाजाची हमी दिली.
याविषयी संताजी नगरातील रस्त्यांच्या सर्व सुधारणा पाहायला मिळतील असे मत इम्रान खान यांनी स्पष्ट येथील स्थानिक नागरिकांना देखील केले आहे.
0 comments:
Post a Comment