चंद्रपूर :
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने मोठी कारवाई करत १६० ग्रॅम एमडी (मेफोड्रॉन) पावडरसह एकूण १६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. crime
दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी उपविभागीय चंद्रपूर पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना, पथकास गोपनीय माहिती मिळाली की,
दिपक कृष्णा वर्मा (वय २८, रा. संजयनगर, मुन्ना गॅरेज जवळ, मुल रोड, चंद्रपूर) आणि आशिष प्रकाश वाळके (वय ३०, रा. मित्रनगर, आंबेडकर कॉलेज जवळ, चंद्रपूर) हे पांढऱ्या रंगाच्या डिजायर कार (क्र. MH-49 AS-2704) ने फॉरेस्ट अकादमी परिसरात येत आहेत.
यानुसार पोलीसांनी मुल रोड, फॉरेस्ट अकादमी समोर नाकाबंदी केली. थोड्याच वेळात संशयास्पद पांढरी डिजायर कार दिसल्यावर ती थांबवून तपासणी करण्यात आली. तपासात वाहनातून १६० ग्रॅम एमडी (मेफोड्रॉन) ड्रग पावडर आणि वाहन मिळून एकूण १६,१२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी दिपक कृष्णा वर्मा याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान, पोअ किशोर वाकाटे, पोशि शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता, अजित शेंडे यांनी केली आहे.
या कारवाईमुळे चंद्रपूर शहरात सक्रिय असलेल्या ड्रग माफियांना चोख संदेश देण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment