भद्रावती तालुका प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी कुठलेही राजकारण न करता किंवा कुठलाही भेदभाव न ठेवता संपूर्ण तालुक्याच्या बळीराजाला, व्यापारी बांधवांना, हमाल,व्यापारी, मापारी तसेच सहकारी संस्थांचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भद्रावती कृषी उत्पन्न बाजार कृषी उत्पादनासाठी गरज भासल्यास तात्पुरत्या स्वरूपाची स्वतःची जागा देखील देण्याची त्यांनी इच्छा दर्शविली आहे. असे मत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या समारोहात अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले.
सोमवार दि २२ मेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.सभापतीपदी भास्कर ताजने तर उपसभापतीपदी अश्लेषा जिवतोडे ( भोयर)विराजमान झाले.यावेळी नवनिर्वाचित संचालकांचा देखील सत्कार करण्यात आला.या पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ) गटाचे भद्रावती- वरोरा विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रवींद्र शिंदे हे . याप्रसंगी तालुक्यातील , सेवा सहकारी संस्था अध्यक्ष व सदस्य हमाल व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कवच कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन सचिव नागोबा पूनवटकर यांनी केले.
0 comments:
Post a Comment