चंद्रपूर:- स्थानिक भगतसिंग चौक येथे भाजपा मध्य मंडळाच्यावतीने बुथ क्र.२३६,२३७ वर 'मन की बात' च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
'Mann Ki Baat' program concluded at booth no.236,237 at Bhagat Singh Chowk
यंदा 'मन की बात' च्या कार्यक्रमाचे १०० वे एपिसोड असून महानगराच्या सर्व बुथवर सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.मन की बातच्या १०० व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,सर्वांची हजारो पत्रे व संदेश मिळालेत.मी हे पत्र वाचण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करतो.अनेकदा पत्र वाचताना मी भावूक होतो.भावनेत वाहून गेलो,पण वेळीच स्वतःला सांभाळले.१०० व्या भागावर मी मनापासून सांगतो की तुम्ही अभिनंदन केले आहे,तुम्ही सर्व श्रोते पात्र आहात असे म्हणाले.
याप्रसंगी लक्ष्मण महालक्ष्मे,बुथ प्रभारी कार्तिक मुसळे,बुथ प्रभारी प्रसाद काळपाताळ, शक्तीकेंद्र प्रमुख नकुल आचार्य,भाजयुमो जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,उमेश वांढरे,मयुर घरोटे,राजु हिवरे,प्रफुल टिपले,निरज पडीगेलवार यांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment