भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :भद्रावती नगर परिषदेतर्फे महाराष्ट्र राज्याचा 63 वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी नगर परिषद कार्यालयाजवळील सेवादल मैदानात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते 75फुट ऊंचीच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यासाठी खास स्तंभ तयार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला आमदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनील धानोरकर, मुख्याधिकारी विशाखा शेळकी,तहसिलदार अनिकेत सोनवणे, संवर्ग अधिकारी डा. मंगेश आरेवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शहरातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्राला देशातील एक बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करण्याचे आवाहण केले.यासाठी प्रत्येक तरुणाने व नागरिकाने आपापल्या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती साधुन राज्याचा मानबिंदू उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले. नगराध्यक्ष अनील धानोरकर यांनिही राज्य निर्माणासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाला नगर परिषदेचे पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी तथा शहरातील नागरीक उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment