बल्लारपूर :हिंगणघाट येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रांत स्तरीय शिबिरात युवक-युवती मोठ्या संख्येने अहेरी,एटापल्ली,सिरोंचा, भामरागड,जिवती,कोरपना,राजुरा,बल्लारपूर या सर्व परिसरातून सहभागी झाले. देशधर्म, सामाजविकास, संस्कृती असे अनेक विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊन प्रशिक्षणार्थी परतीच्या प्रवासातून बल्लारपुर रेल्वे स्टेशन येथे आले. तेव्हा त्या सर्व युवक/युवतींची भाजपा अनु. जमाती मोर्चा,महानगर चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष तथा जनजाती सुरक्षा मंच चे सह-संयोजक धनराज पुन्नम कोवे, यांनी सदीच्या भेट घेतली .BJP Scheduled tribe
Morcha distributes food and goodwill to Vanvasi Kalyan Ashram campers
तेव्हा सोबत गंगाधर कुंटावार, रामेश्वर पासवान,राहुल काळे, प्रसाद, आकाश गावतुरे, सोबत होते. भाजपा अनु. जमाती मोर्चा, महानगर चंद्रपूर यांच्या मार्फत भोजनाची व्यवस्था रेल्वे स्टेशन जवळील हनुमान मंदिर, बल्लारपूर येथे करण्यात आली होती. युवक-युवती यांच्या सह-भोजन करतांना युवकांनी आपले शिबिरातील अनुभव सांगितले व भविष्यात आम्हाला जीवनात त्या सर्व मिळालेल्या मार्गदर्शनाचा खूप फायदा मीळेल असे ते बोलत होते.
सदर प्रशिक्षण शिबिरात 250 युवक, युवती प्रांतातुन उपस्थित होते. हे शिबीर 30 एप्रिल पर्यंत होते.
यावेळी जनजाती, सुरक्षा मंचाचे क्षेत्र प्रमुख श्री. विनायकरावजी सुरतने, कल्याण आश्रम चे प्रांत संघटन मंत्री,श्री रमेशजी आत्राम,प्रांत सह-सचिव,निताताई किटकरु,प्रांत शिबिर प्रमुख तसेच विभाग संघटन मंत्री प्रज्योतजी हेपट,प्रांतपदाधिकारी, विभाग संघटन मंत्री इत्यादी प्रमुखाने उपस्थित होते
0 comments:
Post a Comment