Ads

राधाकृष्ण मंदिर बगीच्यांचे शेड ही पडले !

घुग्घूस : शहरात पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बगिच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले आहे एका मागे एक शेड पडत आहे.The shed of the Radhakrishna temple garden has fallen!
सदर शेड हे बांबूच्या पिल्लरवर लोखंडी अंगल टाकुन निर्माण केले असल्यानेच बांबू सडून शेड पडत आहे.वारंवार या भ्रष्टाचाराची तक्रार करून ही संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई केल्या जात नाही.

घुग्घुस शहरात जवळपास कोट्यवधी रुपयांचे खर्च करून तीलकनगर ते शिव नगर जवळपास दहा बगीचे निर्माण करण्यात आले
यांपैकी तीलकनगर येथील बगीच्यांचे शेड सर्वात आधी पडले यानंतर शिव नगर व सुभाष नगर येथील शेड पडले या शेड मध्ये तीन शाळेकरी मुली दबून घायाळ झाल्याने काँग्रेस नेत्यांनी सदर मुलींना रुग्णालयात दाखल करून या भ्रष्टाचाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असता नगरपरिषद व बांधकाम विभागाने बगीच्यांना भेट देऊन शेड दुरुस्तीचे आश्वासन दिले होते मात्र ते पोकळ आश्वासन असल्याचे आज सिद्ध झाले असून आज साई नगर येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील शेड पडले सुदैवाने आज पाऊस पडत असल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार विशाल मादर,अंकेश मडावी यांनी घटनास्थळी भेट दिली
या भ्रष्टाचार विरोधात काँग्रेस तर्फे लवकरच आंदोलन छेळण्याचा इशारा रेड्डी यांनी दिला
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment