भद्रावती तालुका प्रतिनिधी:-
कोळसा खाणीत काम करताना कामगारांनी माझी सुरक्षा माझी जबाबदारी या तत्त्वावर काम करीत खाणीत कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही व त्यात कामगारांना इजा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन खाण प्रबंधक आर.के. आचार्य यांनी खाणीतील कामगारांना केले.Miners should work on the principle of 'My Safety, My Responsibility' - Mining Manager RK Acharya.
वेकोलीच्या वणी क्षेत्रातील बेलोरा -नायगाव कोळसा खाणीत कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सदर कार्यक्रमाला खान प्रबंधक आर. के. आचार्य, कार्मीक प्रबंधक विनोद पाटील, कन्नमवार ,संजय काळमेघ, अनिल बोरडे, किशोर बोबडे, विजय मालवी ,डी.पी. पाटील, निषाद भाई, श्रीकांत माहुलकर, सृमन सिन्हा, विश्वकर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. या वित्तीय वर्षात बेलोरा- नायगाव कोळसा खाणीने 245 करोड नफा प्राप्त करून वेकोलीच्या इतिहासात एक नवा विक्रम केला असल्याचेही खाण प्रबंधक आचार्य यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीला खान प्रबंधक आचार्य यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन कोल इंडिया गीताचे गायन करण्यात आले यावेळी कामगार दिनाचे औचित्य साधून खाणीतील योगेश इंगोले, व्ही.हटेवार, अमर चहारे, अशोक पानपट्टे, संजय माणूसमारे, बंडू भोंगळे ,सुधीर ताजने विनोद बोबडे, कुचनकर आदी कामगारांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल इखारे यांनी तर आभार सुरक्षा अधिकारी अनिल बोरडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील बिपटे, रोशन जोगी, संकेत खोकले ,जीवन मत्ते, राजेश खोके आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला खाणीतील अधिकारी, कामगार प्रतिनिधी तथा कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment