Ads

सावली तालुक्यात धुमाकूळ घालून चार जणांचे बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद

सावली : सावली तालुक्यातील बोरमाळा, चेक विरखल आणि वाघोलीबुटी या परिसरात धुमाकूळ घालून चार जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला वन विभागाच्या शार्प शुटरनी अखेर जेरबंद केले सावली शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास वन विभागाला वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले.The tigress that killed four people after rampaging in Savli taluka has finally been jailed
या वाघिणीला लवकरच नागपुरातील गोरेवाडा प्रकल्पात पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ५० ट्रॅप कॅमेरे, पाच पिंजरे आणि शंभर वनकर्मचारी तैनात करण्यात आले होते. सावली तालुक्यात या वाघिणीने धुमाकूळ घालून आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. ३० मार्चला बोरमाळा येथील हर्षल काळमेघे हा चार वर्षीय बालक घराशेजारी शौचाला बसला होता. तेव्हाच वाघिणीले त्याला उचलून नेत ठार केले. १८ एप्रिल रोजी चेक विरखल येथील मंदाबाई सिडाम या महिलेवरही हल्ला करून ठार केले.

२६ एप्रिल रोजी ममता बोदलकर या वृद्ध महिलेस ठार केले. या घटना ताज्या असतानाच उपवन क्षेत्र व्याहाडखुर्द अंतर्गत वाघोलीवडी येथील प्रेमिला रोहनकर हिच्यावरही वाघाने हल्ला केला. सातत्याने वाघाचे हल्ले वाढत असल्याने संतप्त नागरिकांनी मृतदेह न उचलण्याचा- निर्णय घेतला होता. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याच्या मार्गावर होती. आमदार विजय वडेट्टीवार यांनी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इशारा देत ग्रामस्थांनी वाघाला ठार केले तर त्यांना अटक करू नका असे कडक शब्दात ठणकावले होते. तेव्हापासूनच वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या नेतृत्वात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर मराठे व वन विभागाचे इतर कर्मचारी सातत्याने वाघिणीच्या मार्गावर होते. शनिवारी दुपारी खोब्रागडे यांनी वाघिणीला सावलीच्या जंगलात बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देऊन बेशुध्द केले. वाघिणीला सध्या सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात ठेवण्यात आले आहे. तिथून नागपूरच्या 'गोरेवाडा प्रकल्पात पाठविण्यात येणार असल्याची माहितीविभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment