चंद्रपूर - दोन दशका पासून समाजकार्याला बांधिलकी म्हणून' अंगीकारणाऱ्या स्थानिक विकलांग सेवा संस्थेमार्फत दिव्यांग सल्ला मार्गदर्शन, शिवभोजनसेवा, जुनी कपडे संकलन व वितरण, सॅनिटरी नॅपकिन वितरण वृक्षारोपण, संगोपन उपक्रम सातत्याने राबविले जातात.
Distribution of Sewing Machines and Bicycles and Materials by the Guardian Minister Sudhir Munguntiwar
अलीकडेच 02 गरजू युवतीना आत्मनिर्भर व स्वयंम- रोजगारांसाठी 02 'शिवण यंत्र,' एका शालेय विद्यार्थिनीला 'सायकल 'व 'शिवभोजन' केंद्राला उपयुक्त भांड्याचे वितरण महाराष्ट्राचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार 'यांचे हस्ते संपन्न झाले.
चंद्रपूरात संपन्न झालेल्या उपक्रमाला डॉ मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, रवी गुरुनुले व अन्य मान्यवराची विशेष उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री धनंजय चोंडकर, प्रसाद पा न्हेरकर, देवराव कोंडेकर, पूजा चहा रे सीमा दुपारे, राजश्री भोसले,खुशाल ठलाल इत्यादीनी सहकार्य दिले.
0 comments:
Post a Comment