राजुरा :उत्तरप्रदेश मधील ग्यानोदय विद्यामंदिर हायस्कुल, जगदीशपूर, प्रतापगढ येथील इयत्ता नववीत शिक्षण घेणारी कु. मानवी दिनेश सिंग व तिचे दोन लहान भाऊ लक्ष हिमांशु सिंग इयत्ता दुसरी व कायरव हिमांशु सिंग इयत्ता पहिली गीतानगर येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. हे सर्वजण उत्तरप्रदेश येथून राजुरा येथे राहणाऱ्या आपल्या आत्या कडे उन्हाळी सुट्ट्यामध्ये आले होते . जागतिक पर्यावरण दिना निमित्याने या चिमुकल्यानी स्वतः पर्यावरण वर आधारीत चित्र काढले आणी राजुरा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरून पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण चा संदेश दिला.Environment awareness message of Uttar Pradesh child student in Maharashtra.
राजुरा मधील सोमनाथपूर वार्डमध्ये राहणाऱ्या शिक्षिका पल्लवी संदीप आदे यांच्या घरी हे मुलं अभ्यासाकरिता जातात. सुट्ट्या असल्या तरीही नियमितपणे अभ्यास सुरु असावा म्हणून हे मुलं आदे यांच्या घरी जात. अश्यातच जागतिक पर्यावरण दिनाचे अवचित्य साधून या मुलांनी पर्यावरण व त्यातील दुष्परिणाम दाखविणारे, पर्यावरण जनजागृती करणारे चित्र तयार केले आणी शहरात फिरून जनजागृती करण्याचा विचार बोलून दाखविला. यावेळी शिक्षिका पल्लवी आदे यांनी मार्गदर्शन करून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वन्यजीव संवर्धन समिती चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संदीप आदे यांनी या विध्यार्थीना सोबत घेऊन त्यांची इच्छा पूर्ण करून दिली. यादरम्यान त्यांनी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, सहाय्यक शिक्षक रुपेश चिडे यांनी या मुलांना पेनी भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
उत्तरप्रदेश मधून उन्हाळी सुट्ट्या घालवायला आलेल्या या चिमुकल्यानी राजुरा शहरात फिरून चित्राच्या माध्यमातून जी पर्यावरण संवर्धन करिता जनजागृती केली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे.----------
0 comments:
Post a Comment