Ads

भद्रावती येथे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना सामूहिक श्रद्धांजली.

भद्रावती तालुका प्रतिनिधी :
भद्रावती शहरातील डा.बाबासाहेब आंबेडकर चौकात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना शहरातील सर्व राजकीय पक्ष तथा विवीध संघटनांतर्फे सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. Collective tribute to late MP Balu Dhanorkar at Bhadravati
यावेळी आमदार प्रतिभाताई  धानोरकर, नगराध्यक्ष अनील धानोरकर, जेष्ठ नागरीक बळवंतदादा गुंडावार, वच्छलाताई धानोरकर, वंदना धानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिप प्रज्वलन करुन व दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन श्रध्दांजली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी शहरातील विवीध राजकीय पक्षांच्या व संघटनाच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत प्रकट करुन बाळू धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कोणताही राजकीय वारसा नसतांना खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करुन आपल्या राजकीय कौशल्याने खासदारकीचे जिल्ह्यातील ऊच्च शिखर गाठले याविषयी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून माहिती दिली. यावेळी बळवंतदादा गुंडावार, किशोर टोंगे,विजय वानखेडे, इंटकचे धनंजय गुंडावार, पांडुरंग टोंगे, सचिन सरपटवार,लक्ष्मण बोढाले,सुरज गावंडे आदिंनी आपल्या शोकसंवेदना प्रकट केल्या.खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे ला दिल्ली येथील मेदांता हास्पिटल येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर वरोरा येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक् पांडुरंग टोंगे यांनी तर संचालन सुरज गावंडे यांनी केले. सदर श्रध्दांजली कार्यक्रमाला शहरातील विवीध राजकीय पक्षांचे व संघटनांचे प्रतिनिधी तथा शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment