तालुका प्रतिनिधी (भद्रावती):-
तालुक्यातील घोडपेठ येथील हायवेलगत असलेल्या एका महाकाय जिर्ण वृक्षामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. या वृक्षामुळे अपघाताचा संभाव्य धोका निर्माण झाला होता.हा वृक्ष तोंडण्यात यावा यासाठी घोडपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे यांनी मागणी केली होती. याशिवाय हा जीर्णवृक्ष तोडण्यासाठी अनेक निवेदनही देण्यात आली होती. अखेर या सर्वांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा जीर्ण वृक्ष तोडून घोडपेठ येथील नागरिकांना व हायवेवरील वाहतूकदारांना दिलासा दिला आहे.Finally he cut down the dilapidated tree which invited the accident.
घोडपेठ येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर व हायवेच्या अगदी कडेला असलेला हा वृक्ष अतिशय जिर्ण झालेला होता. या जीर्ण वृक्षामुळे शाळेचे विद्यार्थी,गावकरी व हायवेवरील वाहतूकदारांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या वृक्षाच्या जीर्ण असलेल्या फांद्या पडून किरकोळ अपघातही झाले होते. कोसळण्याच्या अवस्थेत असलेला हा वृक्ष अपघाताला एक प्रकारचे निमंत्रण देत होता. एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी हा वृक्ष तोडण्यात यावा यासाठी गावकऱ्यांच्या वतीने घोडपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मागणी केली होती. या आशयाच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर लगेच याची दखल घेत सार्वजनिक विभागाने या जीर्ण वृक्षाची विल्हेवाट लावली.
0 comments:
Post a Comment