Ads

कोतवाल नियुक्त्या रद्द करून पारदर्शक पद्धतीने पुन्हा परीक्षा घ्या

(प्रशांत गेडाम)ब्रह्मपुरी -ब्रह्मपुरी तालुक्यातील कोतवाल भर्ती संदर्भात १५ जून रोजी तहसीलदार ब्रह्मपुरी यांच्या मार्फत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात १६ जून रोजी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी येथील तहसील कार्यालयात निवेदन देऊन पुन्हा एकदा परीक्षा घेण्याची मागणी केली होती. त्या नंतर आज सोमवारी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी परीक्षार्थींसह उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांची भेट घेऊन सदर कोतवाल भरती रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.Cancel the Kotwal appointments and re-exam in a transparent manner
या वेळी पुन्हा परीक्षा न घेतल्यास परीक्षार्थींसह उपोषणाला बसण्याचा इशारा माजी आमदार देशकर यांनी प्रशासनाला दिला आहे. परीक्षार्थीं शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते
*कोतवाल नियुक्त्यांना स्थगिती देण्याचे मा. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.*
सदर सर्व प्रकार बघता चंद्रपूर मा. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कोतवाल नियुक्त्याना स्थगिती देण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात खासदार अशोक नेते, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर व चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोन द्वारे चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियुक्त्याना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment