सोलापूर : अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरांना नोंदणी द्या अन्यथा मुंबई मंत्रालयासमोरआंदोलन छेडणार असे वक्तव्य आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी केले आहे .Give registration to alternative medicine doctors or protest in front of Mumbai Ministry: Dr Ameer Mulani
अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरांवरती अन्याय होत आहे पॅथीप्रमाणे प्रॅक्टिस करत असताना बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली जात आहे ही कारवाई पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केली जात आहे केंद्र शासन, राज्य शासन, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट व तालुका न्यायालय तसेच जिल्हा न्यायालय यांच्या आदेशांचे अवमान करून कारवाई केल्या जात आहे तरी महाराष्ट्रातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना अल्टरनेटिव्ह मेडिसिन आदेशाचे तसेच कोर्टाच्या आदेशाचे संपूर्ण ज्ञान देणे खूप गरजेचे आहे कोणत्याही आदेशाचे पाहाणी न करता कारवाई केली जाते. अल्टरनेटिव्ह मेडिसिन बोगस असल्याचे स्पष्टीकरण द्यावे व हे सर्व डॉक्टर ही बोगस आहेत याचा पूर्ण तपशील द्यावा शासकीय अधिकाऱ्यांनी अल्टरनेटिव्ह मेडिसिन बोगस आहे असे लेखी स्वरूपात उत्तर दिले तर महाराष्ट्रातील सर्व अल्टरनेटिव्ह मेडिसिन सेंटर आम्ही बंद करू जर तुम्ही म्हणाल तर अल्टरनेटिव्ह मेडिसिन प्रॅक्टिस करू शकता तर सर्व अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टरांना नोंदणी द्यावी दोन्हीपैकी कोणतेही एक उत्तर लेखी स्वरूपामध्ये द्यावे अन्यथा मुंबई मंत्रालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी दिला आहे.
0 comments:
Post a Comment