Ads

प्रेमास नकार दिल्याने पेट्रोल ओतून अल्पवयीन मुलीला जाळण्याचा प्रयत्न

भद्रावती तालुका प्रतिनिधी : बेलगाव येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने प्रेमास नकार दिल्याने युवकाने तिच्या घरी जाऊन अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भद्रावती येथे घडली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच मुलीला लगेच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. As the girl refused love, the youth tried to burn her by pouring petrol on her body
पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली. सिद्धांत भेले (२८, रा. बेलगाव) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी सिद्धांत भेले आणि पीडित मुलीची ओळख होती.

आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमा प्रपोज केले. मुलीने त्याला ठाम शब्दात नकार दिला. दरम्यान, काही वेळाने आरोपी सिद्धांत याने एका बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन थेट पीडित मुलीच्या घरी गेला आणि अंगावर टाकून जाळण्याच्या प्रयत्नात केला. कुटुंबीयांनी धावाधाव करून मुलीला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी प्रकरणात आरोपी युवक व अल्पवय मुलीच्या कुटूंबियांकडून माहिती घेतली जात आहे. पुढील तपास ठाणेदार इंगळे करीत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment