Ads

स्वता:च्या पक्षात अस्तित्व ठिकवू न शकणारे नेतेच विविध पक्षात प्रवेश करुन राहिले : भाजपा नेते महेश कोलावार यांचा दलबदलू नेत्यांना टोला

चंद्रपूर :- स्वता:च्या पक्षात अस्तित्व ठिकवू न शकणारे नेतेच विविध पक्षात प्रवेश करत आहेत असा टोला भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी दलबदलू नेत्यांना मारला आहे.
Leaders who could not survive in their own party continued to join various parties: BJP leader Mahesh Kolawar's advice to defection leaders
पुढे महेश कोलावार यांनी म्हणाले की केवळ स्वता:च्या राजकारणासाठी, स्वता:च्या स्वार्थापोटी लोक अनेक पक्ष बदलत असतात.
त्यामुळे राजकारण म्हणजे केवळ पैशांचा व पदांचा बाजार झाला आहे.पैसा फेको तमाशा देखो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे जो-तो निवडणूक लढविणारा व्यक्ती केवळ पैशाच्या जोरावर व विविध आश्वासन देऊन निवडणूक जिंकण्याचे स्वप्न रंगवतो.मग जिंकल्यावर मात्र केवळ खुर्ची सांभाळण्यात व लावलेल्या पैश्यापेक्षा दुप्पट काढण्यात गुंग असतो. यामुळे दिलेले आश्वासनाकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने कुठलेही विकासकामे होत नसतात.यात निवडून दिलेल्या मतदाराचा विकासकामाअभावी अपेक्षा भंग होतात आणि पाच वर्ष असेच निघून जातात.

दुसरीकडे काही ठिकांनी आरक्षण असल्यामुळे कित्येक अशिक्षित लोकांना काही हुशार व्यक्ती राजकारणात उतरवून पैसा कमविण्याचे कार्य करत आहेत. जिंकून आलेल्या मतदाराला मात्र आपण काय करायचे,आपली जबाबदारी काय आहे हे देखील माहित नसते.याचे कारण म्हणजे अशिक्षितपणा.याच अशिक्षितपणाचा आणि आरक्षणाचा फायदा काही राजकारणातील हुशार व्यक्ती घेत राजकारणाचा खेडखंडोबा करतात. त्यामुळे देशाचे राजकारण किती घसरत आहे याचे चित्र आपण रोजच विविध बातम्यांमधून बघत असतो.

याचा अर्थ प्रत्येक निवडणूकदार असाच आहे असेही नाही. निवडणूकदार पैसे न वाटता व मतदार पैसे न घेता मतदान प्रक्रिया राबविण्याचे दिवस आले पाहिजेत. त्यासाठी आज मतदाराला जागृत होण्याची गरज आहे. तसेच  स्वार्थापोटी  व पदासाठी सतत दल बदलणा-या नेत्यांना जनतेनी चांगलाच धडा शिकविला पाहिजे.कारण पक्षासाठी अहोरात्र काम करणारे नेते व कार्यकर्ते अजूनही विविध पक्षात आहेत.पण त्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना राजकारणातील पद वाटप करतांना मात्र  डावलण्याचे षडयंत्र विविध पक्षात रचले जात असते.याचे कारण म्हणजे सतत दल बदलून स्वार्थासाठी राजकारण करणारे नेते आहेत.अश्या गलिच्छ राज्यकर्त्यांना जनतेनी आगामी निवडणूकीत सबक शिकवावा असे आवाहन महेश कोलावार यांनी यावेळी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment