Ads

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी वढा येथे घेतले विठ्ठलाचे दर्शन

चंद्रपुर : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी विदर्भातील प्रति पंढरपूर समजल्या जाणा-या वढा तिर्थक्षेत्र येथे जात विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शेतक-यांना सुख समृद्धी देण्याची मनोकामना केली. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, बंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारे, शहर संघटक विश्वजित शहा, ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, सतनाम सिंग मिर्धा, निलिमा वनकर, रुपा परसराम, वंदना हजारे, कविता निखारे, प्रमिला बावणे आदींची उपस्थिती होती. On the occasion of Devshayani Ashadhi Ekadashi, MLA Kishore Jorgewar took darshan of Vitthala at Vadaa
चंद्रपूरातील धार्मिक स्थळांना महत्व प्राप्त करुन देण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती राज्यात पोहचावी यासाठी आपण महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. याला लाभलेला लोकसहभाग ऐतिहासिक आहे. यासोबतच वढा तिर्थक्षेत्रही आपल्याला धार्मिक आणि पर्यटनदृष्टा विकसीत करायचे आहे. यासाठी शासनस्तरावर माझे प्रयत्न सुरु आहे. यात गावक-र्यांचाही सहभाग लागणार आहे. हे ठिकाण विकसीत झाल्यास वढा गावाचे धार्मिक महत्व वाढणार असुन रोजगारांच्या संधीही ग्रामस्थांना मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी त्यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन नागरिकांच्या सुदृढ आरोग्याची प्रार्थना केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment