Ads

इंदोर स्टेडियम मध्ये अडकले घुबड. पक्षी मित्रांनी रेस्क्यू करून दिले जीवदान. Owl stuck in Indore stadium. Bird friends rescued and gave life.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-शहरातील शिंदे महाविद्यालयाच्या इंनडोअर बॅडमिंटन स्टेडियम मध्ये एक घुबड अडकले.याची माहिती शहरातील नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थेचे विभागीय उपाध्यक्ष श्रीपाद बाकरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने त्याला पकडले व त्याला शहरा नजीक असलेल्या एका जंगलातील नैसर्गिक अधिवासात निसर्गामुक्त केले.Owl stuck in Indore stadium.
 Bird friends rescued and gave life.
 सदर घुबड हे मराठीमध्ये गवानी घुबड या नावाने तर इंग्रजीमध्ये बर्न आऊल या नावाने ओळखले जाते. शहराच्या अगदी मध्यवस्तीमध्ये असलेल्या शिंदे महाविद्यालयाच्या इनडोअर बॅडमिंटन स्टेडियम मध्ये सदर घुबड अडकले होते. त्याला त्यातून बाहेर निघता येत नव्हते.सदर माहिती श्रीपाद बाकरे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले सहकारी तथा सार्ड संस्थेचे सदस्य अनुप येरणे,आशीष चहाकाटे, शैलेश पारेकर, इम्रान पठाण आणि वन कर्मचारी व वनमधून यांचे सहकार्याने या घुबडाला पकडले. वनविभागात या घुबडाची नोंद करण्यात आल्यानंतर त्याला शहरा नजीक असलेल्या जंगलात निसर्ग मुक्त करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment