Ads

समय टोंगे चा नीट परीक्षेतील नेत्रदिपक यश प्राप्त केल्याबद्दल सत्कार

भद्रावती तालूका प्रतिनिधी :-
शहरातील गौतमनगर येथील रविकांत रामभाऊ टोंगे यांचा मुलगा समय याने राष्ट्रीय पात्रता वैद्यकीय प्रवेश परीक्षा २०२३ नीट मध्ये नेत्रदिपक यश संपादित केले आहे. समय ला सातशे वीस पैकी सहाशे अठ्ठावीस गुण मिळाले आहे. सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने समय टोंगे चा नुकताच सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समयचे वडील रविकांत, आई वैशाली, भाऊ अर्थ आणि आजोबा रामभाऊ टोंगे उपस्थित होते.Samay Tonge felicitated for his spectacular success in NEET
ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे यांच्या शुभहस्ते वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखीत ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन समय टोंगे चा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना ( ठाकरे ) गटाचे तालुका प्रमुख तथा नगरसेवक नंदु पढाल , शहरप्रमुख घनश्याम आस्वले आणि प्रहार शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष शंकर मिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment