Ads

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभम चांभारेसह शेकडो युवक कार्येकर्त्यांचा भाजपात प्रवेश

वरोरा(प्रती): मोदी@9महाजनसंपर्क अभियान दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता दि.25जून रोजी आनंदवन चौक वरोरा येथे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा कार्येकर्ते शुभम चांभारेसह शिरीष डहाके,आशुतोष घाटे, शाहरुख पठाण,हर्षल बोंडे, हर्षल डोंगरे, प्रणय चांभारे, साहिल चांभारे, सतीश तडस, प्रफुल नरडे अक्षय सिडाम,अरबाज खान या शेकडो युवा कार्येकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
Shubham Chambhare and hundreds of youth activists joined the BJP in the presence of Deputy Chief Minister Fadnavis
याच बरोबर जिल्ह्यातील ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे व मागील विधानसभेतील (वरोरा -भद्रावती क्षेत्र )मनसेचे उमेदवार रमेशजी राजूरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे विरोधकांना बसलेला धक्काचं म्हणावा लागेल. जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होत असतांना दिसत आहे.
शुभम चांभारे सारखे तडफदार युवा नेतृत्व भाजपाला मिळाल्याने भाजपच्या गोटातील तरुण युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पक्षाचे ध्येय -धोरण तळागाळातील जनतेपर्यन्त पोहचविण्याचे काम तसंचे पक्षाची संघटनात्मक बांधणी यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत राहील असा मानस शुभम चांभारे यांनी प्रवेश दरम्यान व्यक्त केला. यावेळी मा.आ.बंटी भांगडीया,मा.आ. पारिणय फुके, बाबा साहेब भागडे, करणभाऊ देवतळे, अहेतेशम अली, सुरेश महाजन, आशिष ठाकरे , ओम मांडवकर, आकाश भागडे, मनीष तुंपल्लीवर, राजू दोडके, 8कीर्तीताई कतोरे, अक्षय भिवंदरे , दिलीप घोरपडे, महेश श्रीरंग, कादर शेख, जगदीश तोटावार, अभय मडावी, तथा भाजपा/भाजयुमो पदाधिकारी,कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment