Ads

महाराष्ट्र शासन आपल्या दारी शिबीरात मोहाळी परीसरातील हजारो नागरीकांनी घेतला लाभ

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - सर्वसामान्य़ नागरीकास शासकीय काम करण्याकरीता शासकीय कार्यालयात येणे, योजनांची माहीती घेणे, योजनेसाठी आवश्यक़ असलेले दस्तऐवज़ विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रकीयेतुन जावे लागते. शासनाची नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करुन देणारी ही कार्यालये वेगवेगळया ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरीकांना वेगवेगळया कार्यालयात जावे लागते.तसेच सादर केलल्या कागदपत्रामध्ये त्रृटी असल्यास त्या दुर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते.काही वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडुन देय योजनांची माहीती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजु व्यक्तीपर्यत पोहोचु शकत नाही. Thousands of citizens of Mohali area have benefited from Maharashtra Government's At your Door Camp
या सर्व त्रासापासुन नागरीकांना मुक्त़ करुन तालुक्यातील सर्व कार्यालय एकाच ठीकाणी आणुन नागरीकांना तात्काळ सेवा देण्याकरीता दिनांक 07/06/2022 ला तहसिल प्रशासनामार्फत श्री प्रियेश महाजन उपविगीय अधिकारी सिंदेवाही यांचे अध्यक्षतेखाली व तहसिलदार श्रीमती निलीमा रंगारी यांचे उपस्थितीत जिल्हा परीषद प्राथमीक शाळा मोहाळी येथे“महाराष्ट्र शासन आपल्या दारी”“Government of Maharashtra at your door” हा उपक्रम राबवीण्यात आला. सदर कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणुन ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजय वडेटटीवार MLA Shri Vijay Vadettiwar हे उपस्थित होते.
आमदार श्री विजय वडेटटीवार यांचे हस्ते वनविभागामार्फत लाभार्थींना सौर कुंपन मशिन,वन्यजीव यांचे हल्यात मृत पावलेल्या व्यक्तीचे कुटुंबीयांना 10 लक्ष रुपयाचे धनादेश, महसुल विभागामार्फत संजय गांधी योजनेचे मंजुरी आदेश,राशनकार्ड,जातीचे व इतर दाखले पंचायत समीतीमार्फत घरकुल योजनांचे वाटप,आयुष्यमान भारत योजनाचे हेल्थ़ कार्ड महीला व बालकल्यान विभागामार्फत बेबी केअर किट याप्रमाने तालुक्यातील सर्व विभागांच्या सेवा मौजा-मोहाळी(नले.) परीसरातील नागरीकांना उपलब्ध़ करुन देण्यात आले.
कार्यक्रमात महसुल विभागामार्फत् नायब तहसिलदार श्री आर.व्ही.नेवारे,श्री डी.जे.धात्रक व श्री आर.पी.मसराम यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी गेडाम, तलाठी अहिरकर,मुरकुटे,श्रीरामे,शेंडे व महसुल कर्मचारी ,तलाठी यांनी कार्यक्रम यशश्वी करण्याकरीता सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन आशिष गुरनुले व मदन यादव यांनी केले तर आभार प्रर्दशन युवराज मसराम यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment