Ads

पोलीस पाटलाकडे सापडले राज्यात बंदी असलेले बियाणे : माय-लेकावर कार्यवाही

गोंडपिपरी :राज्यात बंदी असलेल्या कापसाचे बियाणे जिल्हातील हजारो शेतकऱ्यांनी पेरले.त्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगविलेच नाही. त्यामुळे हा प्रकार उघडकिस आला.बंदीचे बियाणे विक्री करणाऱ्यांना प्रशासनाचे पाठबळ असल्याचा प्रकार जिल्हात उघडकीस आला.गावात होणाऱ्या चोर धंद्याची माहिती देण्याची जवाबदारी ज्या पोलीस पाटलाकडे असते त्याच महिला पोलीस पाटील आणि त्याचा मुलाला कृषी विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे बंदी असलेले चोर बीटी ही कापसाचे बियाणे आढळून आले. ही कार्यवाही गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथे करण्यात आली.
Banned seeds found At police Patil House: Action on Son&Mother
तेलंगनाचा सीमेवर असलेलं गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर हे लहानसे गाव. या गावातून राज्यात बंदी असलेलं कपाशीच चोर बीटी बियाणे मोठ्या प्रमाणात विकलं गेलं. कृषी विभागाने दहा दिवसापूर्वी गावात धाड टाकली होती.मात्र विभागाचा हाती काही सापडलं नाही.अश्यात आज एका शेतात चोर बीटी बियाणे असल्याची माहिती लाठी पोलिसांना मिळाली. पोलीस विभागाने याची माहिती कृषी विभासगाला दिली. कृषी विभागाने धाबा-सकमूर मार्गांवरील जक्कुलवार त्यांचे शेत गाठले.साडेतीन किलो बंदी असलेले बियाणे सकमूर गावातील महिला पोलीस पाटील भाग्यश्री महेश मुत्तमवार यांच्याकडे आढळून आले.पोलीस पाटलाकडेच बंदीचे बियाणे आढळून आल्याने कृषी विभागालाही धक्का बसला.भाग्यश्री मुत्तमवार यांनी डोनु जक्कुलवार यांचे तीन एकर शेत भाड्याने घेतले आहे.आज त्या शेतात कपासी तिबत होत्या.गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांनी थेट शेतात जाऊन ही कार्यवाही केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment