Ads

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून मनपाची सावित्रीबाई फुले शाळा बनणार आदर्श मॉडेल स्कुल

चंद्रपुर :जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या शांळामधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा, येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. अखेर त्यात त्यांना यश आले असुन बाबुपेठ येथील मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून सदर शाळेचे सर्वसोयी सुविधायुक्त मॉडल स्कुलमध्ये रुपांत्तर केल्या जाणार आहे.*Savitribai Phule School of Municipality will become model school through efforts of MLA Kishore Jorgewar
जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे खाजगी शाळांप्रमाणे या शाळांमध्येही शिक्षणाचा दर्जा उंचावत अद्यावत तंत्रज्ञान व सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने केली जात होती. बाबुपेठ भागात कामगार वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. येथे मनपाची सावित्री बाई फुले शाळा आहे. सदर शाळा अत्याधुनिक करण्यात यावी याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी आग्रही मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खनिकर्म मंत्री दादाजी भुसे पाटील यांना केली होती. या मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असुन सदर शाळेच्या मॉडेलीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्याच्या संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. अनेक शिक्षण संस्थाना बळकट करण्यासाठी त्यांच्या वतीने संगणक लॅब व इतर सोयी सुविधांकरीता निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वरदान ठरत असलेल्या शासकीय शाळा टिकाव्या या दृष्टीकोनातून राज्यस्तरावर त्यांचे प्रयत्न सुरु आहे. मतदार संघातील ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारावी, येथे नियमित शिक्षक उपलब्ध व्हावा, पालकांचा शासकीय शाळेंबाबत दृष्टीकोन बदलावा त्यासाठीही त्यांचे सातत्त्याने प्रयत्न सुरु आहे.
दरम्यान 2001 ते 2016 या कालावधीमध्ये महाराष्ट्र खनिकर्म महामंडळच्या मर्या. नागपूर यांच्याकडे प्राप्त खनिज विकास निधी हा विविध बॅंकामध्ये ठेव स्वरुपात ठेवण्यात आला होता. सदर ठेवीवर प्राप्त व्याजाच्या रकमेपैकी 1 कोटी रुपयांचा निधी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीवरुन चंद्रपूर येथील बाबुपेठ येथे असलेल्या मनपाच्या सावित्री बाई फुले शाळेच्या विकासासाठी देण्यात आला आहे. या निधीतून इमारत दुरुस्ती करणे, संगणक खरेदी, सुसज्ज लॅब, ई-लर्निग, प्रोजेक्टर स्क्रीन, इंटरॅक्टिव्हबोर्ड तसेच आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व ईतर सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. मागणीची दखल घेत सदर निधी उपलब्ध करुन दिल्या बदल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे पाटील यांचे आभार मानले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment