Ads

सीएसटीपीएसमधील कंत्राटदारांकडून कामगारांचे शोषण

चंद्रपूर : येथील महाऔष्णीक वीज केंद्रात साडे तीन ते चार हजारांवर कंत्राटी कामगार विविध कंत्राटदारांकडे वेगवेगळ्या विभागात आणि वेगवेगळ्या युनिटमध्ये काम करीत आहे. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या वेतन नियमानुसार या कामगारांना काम दिले जात नाही. शिवाय जुन्या कामगारांना काढून नवीन कामगार कमी मोबदल्यात नियुक्त करण्यात येत असल्याने कामगावरांवर अन्याय होत आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, कामगारांना नियमानुसार वेतन देण्यात अशी मागणी इंटक, सिटू या कामगार संघटनेसह सीटीपीएस कंत्राटी कामगार निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.Exploitation of labor by contractor in CSTPS
कामागारांना शासनाच्या नियमानुसार वेतन न देणे, महाजेनकोने ठरवून दिलेले भत्ते न देणे, कंत्राट संपुष्टात आल्यानंतरह चार चार महिने नवे कंत्राट न देणे, राजकीय नेत्याच्या शिफारशीवर आलेल्या कामगारांना काम देऊन जुन्या कामगारांना कामावरून कमी करणे अशा अनेक समस्या येथील कामगारांसमोर आहे. या समस्यांचे निवारण करण्याबाबत सीटीपीएसचे मुख्यअभियंता तसेच महाजेनको यांना वारंवार पत्र पाठपुरावा केला आहे. मात्र, कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे कामगार वर्गांमध्ये असंतोष पसरला असून, ११ जुलैपासून कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तीन दिवसानंतरही सीटीपीएस व्यवस्थापनाने उपोषणाची दखल घेतली नाही. १६ मागण्यांकडे संघटनेने सीटीपीएस व्यवस्थापनाचे लक्ष वेधले आहे. या समस्या न सोडविल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी पत्रकार परिषदेला संघटनेचे वामन बुटले, निताई घोष, प्रमोद कोलारकर, प्रफुल्ल सागोरे, युवराज मैंद, बंडू मडावी, रामा नाईक, सुरेश कोल्हेवार, अशोक मंडल, संतोष ताजणे, नरेंद्र दाढे, किशोर सरकार, अनिल वरखडे, अमोल शेंडे, सिद्धार्थ पाल उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment