चंद्रपुर :-युवासेना प्रमुख आ. आदित्य साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व युवासेना सचीव वरूनजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना व अस्पायर प्रोफेशनल अकॅडमी च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील युवक व युवतींकरिता तलाठी व वनरक्षक ह्या पदाकरिता सराव म्हणून १० दिवसीय निशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आले.Enthusiastic response of the youth and women of the district to the free test series of Yuva Sena's Forest Guard Talathi
१जुलै पासून सुरू झालेल्या या निशुल्क टेस्ट सिरीजचे रोज परिक्षा पेपर्स हे आॅफलाईनच्या माध्यमातून अस्पायर प्रोफेशनल अकॅडमी च्या बंगाली कॅम्प परिसरातील केंद्रावर होत असून यावेळी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या काही समस्या असल्यास त्याचे निराकरण सुद्धा करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक युवतींना जास्तीत जास्त अश्या नोकरी संदर्भात परिक्षेचा सराव व्हावा व शासकीय नोकरीमध्ये सहभाग व्हावा या उद्देशाने युवासेना चे विभागीय सचिव, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ निलेश बेलखेडे यांच्या संकल्पनेतून हा निशुल्क अभिनव उपक्रम करण्यात आले असून यामध्ये जिल्ह्यातील शेकडो च्या वर युवक युवतींनी आतापर्यंत सहभाग घेऊन रोज सकाळी १० वाजता या परिक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी अश्या आयोजनाबद्दल युवासेना चे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अस्पायर प्रोफेशनल अकॅडमी चंद्रपूर संचालक झाडे सर, प्रफुल चावरे यांच्या सह युवासेना, युवतीसेना पदाधिकारी व युवा सैनिकांनी परिश्रम घेतले..
0 comments:
Post a Comment