Ads

त्या' प्रकरणात मुद्दामहून मला फसविले-कांचन रामटेके

चंद्रपूर : दामदुप्पटीचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात तुकूम येथील कांचन रामटेके या महिलेसह सुजाता कांबळे आणि तिचा पती उमाकांत कांबळे या तिघांना २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. याप्रकरणात काचन रामटेके यांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष सुटका केली असून, या फसवणुकीच्या प्रकरणात सुजाता कांबळे या महिलेने मुद्दामहून फसविल्याचे कांचन रामटेके यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी सांगितले.In that case, I was deliberately deceived-Kanchan Ramteke
सुजाता कांबळे ही काही दिवसत तुकूम परिसरात वास्तव्यास होती. माझा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असल्याने ती ब्युटीपार्लरमध्ये येत होती. नियमित येत असल्याने ओळख झाली आणि मैत्री झाली. याचदरम्यान, तिने माझ्याकडून पैसे उसणे घेतले. एका बचत गटातून व्याजाने तिला पैसे मिळवून दिले. मैत्रीण या नात्याने स्वत:कडील सोनसाखळीसुद्धा दिला. परंतु, नंतर तिने पैसे देण्यास नकार दिला. माझ्यासह अनेक महिलांची तिने फसवणूक केली. मला हा प्रकार कळल्यानंतर तिच्या नवऱ्याकडे याबाबत जाब विचारला. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर काही महिलांनी तिच्याविरोधात दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी पैस मागितल्याच्या रागातून तिने माझे नाव पुढे केल्याने दुर्गापूर पोलिसात सुजाता कांबळे दाम्पत्यासह माझ्यावरही गुन्हा दाखल झाला. त्यामुळे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली. प्रकरणामुळे नाहक बदनामी झाली असून, मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे कांचनने सांगितले. सुजाता कांबळे या दाम्पत्याचा महिलांना फसवणुकीचा धंदा असून, विविध शहरात जाऊन काही वर्ष वास्तव्य करून ओळखी वाढवायची आणि नंतर दामदुप्पटीचे आमिष दाखवून फसवणूक करायचे असा त्यांचा धदा असल्याचे कांचन रामटेके या महिलेने पत्रकार परिषदेत सांगितले. हिंगणघाट व अन्य जिल्ह्यातही सुजातावर गुन्हे दाखल असल्याचा संशय कांचनने व्यक्त केला आहे.

अखेर या प्रकरणात न्यायालयाने न्याय दिला असून, निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, यादरम्यानच्या काळात झालेली बदनामी भरून निघणारी नसल्याचे तिने सांगितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment