Ads

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याने वरोरा -चंदनखेडा बस सेवा पूर्ववत सुरू.

भद्रावती जावेद शेेख :राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्या पाठापुराव्याने वरोरा- चंदनखेडा ही बस सेवा पूर्ववत सुरू झाल्याने या भागातील गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
Warora-Chandankheda bus service resumes with the support of NCP.
वरोरा बस स्थानकावर या बसला सुधाकर रोहनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविल्यानंतर अखेर ही बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.वरोरा चंदनखेडा या मार्गावरील पावना या गावाजवळ रस्त्यावरून क्रॉस होणारे विद्युत तार खाली आल्याने वरोरा आगारातर्फे ही बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील पावना, खोकरी,सावरी, वाघेडा, सागरा आदी गावातील गावकऱ्यांना तथा परिसरातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या सर्व गावातील सरपंच तथा गावकऱ्यांनी ही समस्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर रोहनकर यांनी सदर बस सेवा पूर्ववत करण्यासाठी वरोरा आगार प्रमुख, भद्रावती वीज वितरण कार्यालय तथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन याचा पाठपुरावा केला. यानंतर वीज वितरण अधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुधाकर रोहनकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर रस्त्यावर खाली आलेल्या विद्युत तारांना विद्युत खांबांची उंची वाढवून उंच करण्यात आले. या पद्धतीने हा मार्ग मोकळा व सुरक्षित झाल्यानंतर सदर बस सेवा पूर्ववत करण्यात आली. सुधाकर रोहनकर यांनी हिरवी झेंडी दाखवून वरोरा बस स्थानकावरून या बस सेवेला प्रारंभ केला. सदर बस सेवा पूर्ववत झाल्याने या भागातील गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून या सर्वांनी सुधाकर रोहनकर यांचे आभार मानले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment