Ads

20 वर्षीय युवकाचा वर्धा नदित बुडून मृत्यू

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख: नदीत गेलेल्या म्हशी बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एका गुराखी युवकाचा अचानक नदीत पाण्याचा लोंढा आल्यामुळे बुडून मृत्यू झाला. 
सदर घटना तालुक्यातील पिपरी येथील वर्धा नदी घाटावर दिनांक.5/07/2023 रोज बुधवारला सायंकाळच्या सुमारास घडली. दिनांक06/07/23 रोज गुरुवारला सकाळी 8 वाजता त्याचा मृतदेह नदीतून काढण्यात यश मिळाले. अंकुश खेडेकर वय 20 वर्षे राहणार पिपरी असे मृतक युवकाचे नाव असून तो आपल्या आई-वडिलाला एकुलता एक मुलगा होता. मूळचे चामोर्शी तालुक्यातील चाकल पेठ येथील खेडेकर कुटुंब हे अठरा वर्षांपूर्वी पिपरी येथे पोटापाण्यासाठी स्थायिक झाले होते. मृतक अंकुश हा गावातील एका शेतकऱ्याकडे गाई म्हशी चारण्यासाठी नोकरी करीत होता. घटनेच्या दिवशी आपल्या गाई म्हशी नदी काठावर चारत असताना म्हशी नदीतील पाण्यात उतरल्या.या म्हशींना बाहेर काढण्यासाठी अंकुश हा देखील पाण्यात उतरला. मात्र तेवढ्यात नदीत मोठा पाण्याचा लोंढा आल्याने त्यात तो बुडाला. त्याचा मृतदेह आज सकाळी बाहेर काढल्यानंतर शबाविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.आई-वडिलांचा आधार असलेला या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्यामुळे गावात सर्वत्र हडळ व्यक्त होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment