(प्रशांत गेडाम)नागभीड - ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असलेल्या 18 गोवंशाची नागभीड पोलिसांनी सुटका केली. या कारवाई पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन 13 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.Rescue of 18 cattle being taken for slaughter
 |
13 लाख 80हजाराचा मुद्देमाल जप्त
जनावरांची अवैध वाहतूक होत
|
असल्याची गोपनीय माहिती नागभीड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली. दरम्यान, पोलिसांनी एका पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या ट्रकचा पाठलाग करून तपासणी केली असता त्यात 18 बैल करपणे पाय बांधून कत्तलीसाठी कोंबून नेत असल्याचे आढळून आले.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद रजिक मोहम्मद साबीर वय- 44, रा. नालसहाबपुरा, जि. अकोला , संजय गंगाराम नांदुरकर (रा. अकोला) या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, ट्रक क्रमांक- एमएच 40 एन 5792 अंदाजे किंमत 12 लाख रुपये, 18 बैल अंदाजे किंमत 1 लाख 80 हजार रुपये असा एकूण 13 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार योगेश घारे यांच्यासह संजय पोंदे, पोलिस हजवालदा सतीश उपाध्ये, शिपाई अजित शेंडे, रोहित तुमसरे, गजनान मडावी यांनी केली.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment