कोरपना : महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मार्फत कामगारासाठी सुरक्षा संच किट व रोख रक्कम १०,००० देण्याची योजना २०१८ पासून अमलात आली व २०२० मध्ये महाराष्ट्रराज्यभर तक्रारी झाल्याने कागदोपत्री योजना २०२० पासून बंद झाल्याचे दाखविण्यात आले मात्र या विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगणमताने विक्रमी बोगस लाखो मजुरांची नोंदणी करण्यात आली वास्तविक हे कामगार इमारत बांधकाम कामावर जातच नाही असे असताना या योजनेची कामगारांच्या नावाने टाळू वरील लोणी खाण्यासाठी शासनाचे नियम निकष धाब्यावर ठेवून कोट्यावधी रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर जमा न करता परस्पर आर्थिक घोटाळा करण्यात आला, साहित्य निकृष्ट दर्जाची असून शासनाने चढ्या दराने निविदा मंजूर करून गैरव्यवहार केला
Building and Construction Board Labor Safety Kit Scam: File a case- Abid Ali
याबाबत कामगार मंत्री सचिव यांच्यासह पोलीस महासंचालक डॉ यांना दि. २६/०६/२०२३ ला तक्रार दिली व हा गैरव्यवहार किती मोठा आहे याबाबत जागरूक आमदारांना घोटाळ्याची व्याप्ती अवगत करून दिली विधानसभेत लक्षवेधी व औचित्यत्याचा मुद्दा आमदार विजय वडेट्टीवार व मनोहरराव चन्द्रीकापुरे किशोर जोरगेवार इतरांनी गंभीर प्रश्न उपस्थित करून दि. २४/०७/२०२३ ला प्रशासनाचे लक्षवेधून खडबड उडऊन दिली मात्र मंत्री सुरेश खाडे यांनी जे अधिकारी या गैर व्यवहारात सामील आहे यांच्याकडूनच चौकशीची घोषणा करून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाला मात्र भ्रष्टाचारी अधिकारी व पुरवठा दार एजन्सी यांना काही फरक पडणार नाही असे चित्र निर्माण झाले कारण चोरी व गैरव्यवहार करणारेच चौकशी व अहवाल देणार असेल तर? असेअसताना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव इमारत बांधकाम मंडळ मुंबई यांनी दि. १३/०७/२०२३ रोजी पत्र क्रं. १०४७ प्रं.क्रं. २९४ नुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या सुरक्षा किट घोटाळा गैरव्यवहार चौकशी करण्याचे निर्देश कामगार उपायुक्त अमरावती यांना दिले आहे. विभागीय स्तरावर चौकशी पथक गठीत करण्यात आले व चौकशी कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले असले तरी योजनेतील गैरव्यवहार घोटाळा मोठा असून योजना बंद झाल्यानंतर सन २०२३ मध्ये वर्धा, गंगाखेड, परभणी येथे वाटप करण्यात आले कसे? योजना बंद झाली असताना साहित्य आले कुठून कमिशन साठी बोगसमजूर नोंदणी करीतअपूर्ण निकृष्ट साहित्य पुरवठा हा घोटाळा साखळी पद्धतीने भ्रष्टाचार झाला व राज्यातील चांद्यापासून तर बांधापर्यंत कंत्राटदारासह अधिकाऱ्यांचे हात ओले झाले तेव्हा कामगार विभागच काय चौकशी करणार मा. मुख्यमंत्री मा.उप मुख्यमंत्री व कामगार मंत्री सुरेश खाडे तसेच पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे निवेदन देऊन विशेष पथक निर्माण करूण पथकामार्फत विशेष चौकशी करून पुरवठादार गुनिना कमर्शियल प्रा.ली. व इंडो अलाईड फुड्स प्रा. लि. व सहाय्यक कामगार आयुक्त यानचेवर गुन्हे दाखल करून यापूर्वी दोशी असलेल्या वर्धा व उस्मानाबाद जिल्ह्यात गुन्हे दाखल होऊ न सुद्धा कसूरदार मोकाट हिंडत आहे या कृत्यामुळे कामगारांची फसवणूक झाली असून मोठा गैरव्यवहार झालं असल्याने राष्ट्रवादीचे नेते अबिद अली यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न गाजणार अटळ आहार योजना व सुरक्षा किट संच हा प्रकार व बोगस नोंदणी अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगणमताने झाली आहे. कंत्राटदार कंपनी यांनी नोंदणी कागदपत्र निविदा बीट तथा शासनाने टाकून दिलेले अटी व शर्ती भंग करून गैर व्यवहार केला आहे सदर बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अबिद अली यांनी दिली
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment