बल्लारपुर :- शहरातील विद्याश्री कॉन्व्हेन्ट मधील विद्यार्थिनी कु. भार्गवी बालमुकुंद कायरकर हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बल्लारपूर तालुक्यात प्रथम आली आहे.
कु.भार्गवी कायरकर च्या यशाबद्दल तिचे विद्याश्री कॉन्व्हेन्ट मध्ये गौरव करण्यात आले. या वेळी माजी अध्यक्ष वन विकास महामंडल चंदन सिंह चंदेल, शाळेचे संस्थापक कैलाश खंडेलवाल, मुख्याध्यापिका सोनाली आर्य, प्रा. दिलीप शाह, रूमाना शेख, संजय गुप्ता, अश्विन खंडेलवाल, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर , पत्रकार ज्ञानेंद्र आर्य यांची उपस्थिती होती.
विद्याश्री कॉन्वेंटचे शिक्षिका सक समीक्षा, तनुश्री , प्रसाशक सौ. शोभा लाकडे, श्यामला नक्का, रीता यादव, तृप्ति बागडे, विद्या ढेंगड़े, पूनम कैथवास,स्नेहा कैथवास, नेहा पाल, आँचल मुट्यलवार, पूनम नातर, चांदनी ,सरिता निषाद, सुनीता रोहिदास, सुप्रिया कश्यप, भाग्यश्री मेश्राम सह विद्यार्थि , कर्मचारीवृंद व पालकगण उपस्थित होते.
कु.भार्गवी हिने आपल्या यशाचे श्रेय आई प्रा.सौ. सोनाली कायरकर, वडील प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर व शाळेच्या शिक्षकांना दिले आहे.
0 comments:
Post a Comment