Ads

कार्यकर्तेच संघटनेची आत्मा-आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :- यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात मोठे काम केल्या जात आहे. कोरोना काळात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उल्लेखनीय काम केले. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु आहे. यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते शेवटच्या गरजू पर्यंत पोहचून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करत असून कार्यकर्तेच संघटेची आत्मा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.Activists are the soul of the organization. MLA.Kishore Jorgewar
लालपेठ येथील हेल्थ क्लब येथे आयोजीय संघटना प्रवेश कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ताहिर हुसेन यांच्यासह शेकडो युवकांनी यंग चांदा ब्रिगेड मध्ये प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक आघाडीचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक देवा कुंटा, संजय कासर्ला, राम जंगम, अब्बास हुसेन, करणसिंह बैस, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडमध्ये मोठ्या संख्येने युवक शामील होत आहे. सामाजिक क्षेत्रात संघटना उल्लेखनीय कार्य करत आहेच मात्र या सोबतच या संघटनेच्या माध्यमातून नागरिकांचे अधिकाधिक प्रश्न सोडविण्याचा आमचा मानस आहे. आजच्या युवकांनी समाजिक क्षेत्रात आवडीने काम केले पाहिजे. परिसरातील समस्या आमच्या पर्यंत पोहोचविल्या पाहिजे. युवकांच्या अडचणी आपण आमच्या पर्यंत पोहोचविल्या पाहिजे असे आवाहण यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी नवनियुक्त सदस्यांना केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वयंरोजगार निमिर्तीसाठी मोठे काम केल्या जात आहे. महिलांना स्वयमरोजगारातून आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहोत. युवकांनाही प्रशिक्षीत करण्याचा संकल्प आपण केला आहे. यात मोबाईल रिपेअरिंगसह इतर प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाणार असल्याचेही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. आज प्रवेश करणा-या युवकांची जबाबदारी वाढली आहे. आपण युवा आहात युवकांची संघटनेला गरजही आहे. त्यामुळे समाजाला न्याय मिळवून देण्याची भुमिका आपली असली पाहिजे. परिसरात सामाजिक उपक्रम राबवत संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात आपण अग्रसर राहिले पाहिजे. असे यावेळी ते म्हणाले.
सदर प्रवेश कार्यक्रमात लालपेठ सह, बाबूपेठ आणि भिवापूर येथील शेकडो युवकांनी संघटनेत प्रवेश केला. यावेळी संघटनेचा दुपट्टा घालून आमदार किशोर जोरगेवार यांनी नवनियुक्त सदस्यांचे संघटनेत स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रकाश एलटम, जॉन बोलीवार, अश्वीन सल्लम, आशिस गोडसल, शंकर अड्डूर, दाउत सिध्दीकी, राकेश राप्पेलीवार, मोहन बेल्लंमपल्ली, व्यकटेश बेल्लंमपल्ली, सुरज बोल्लम, फैजान कुरेशी, दानेश शेख, स्वरुप दुर्गे, केतन सोवे, साजिद शेख, नविन दुर्गे, लक्की कुंभर, सारंग सिंह राजपूत, शुभर नक्षीणे, अभिजित गिरी, कुणाल सिंग, प्रशांत रत्नपारखी, स्वप्नील पाटील, मुकेश भसारकर, दादू चैव्हाण, नम्मू शेख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment