भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-नाल्यातील रेती काढून तिची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करीत चालक-मालक व तीन मजुरांसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Bhadravati police action against tractors transporting illegal sand.
सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे दिनांक 28 रोज सोमवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास शहरालगतच्या मानोरा फाट्यावर करण्यात आली.या कारवाईत एक ब्रास रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली असा चार लक्ष पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अवैध रेती तस्करी करणाऱ्या तस्करांचे धाबे दनानले आहे. भटाळी येथील ट्रॅक्टर मालक मोरेश्वर आग्रे व ट्रॅक्टर ड्रायव्हर हा तालुक्यातील किलोणी येथील नाल्यावरून ट्रॅक्टर मध्ये अवैधपणे रेती घेऊन जात असताना भद्रावती पोलिसांनी मानोरा फाट्यावर या ट्रॅक्टरला थांबवून कारवाई केली.सदर कारवाई ठाणेदार बीपीन इंगळे, यांचे मार्गदर्शनात जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी शशांक बदामवार अनुप आष्टुनकर, निकेश ढेंगे,यांनी ,ट्रॅक्टर व त्यातील रेती जप्त करून ती पोलीस स्टेशन येथे जमा केले पुढील अधिकतपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment