भद्रावती तालुका प्रतिनिधी : वारसांकडून आपल्याला प्राप्त झालेल्या शेतजमिनीची माझ्या आजोबांनी, वडिलांनी किंवा मी विक्री केली नसताना माझ्या मालकीच्या जमिनीचा अन्य व्यक्तींच्या नावे फेरफार करण्यात आला व मला माझ्या जमिनीतून नायब तहसीलदाराने हुसकावून लावले असा आरोप करीत विक्री न करता माझ्या जमिनीचा फेरफार अन्य व्यक्तींच्या नावाने झाला कसा हा प्रश्न निर्माण करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील दोषी व्यक्तींवर कारवाई करून माझी जमीन मला परत मिळवून देऊन न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक वृंदावन सभागृह परिसरात घेण्यात आलेल्या पत्र परिषदेतून राजू जनार्दन खरवडे या शेतकऱ्याने केली आहे.
तालुक्यातील घोनाड येथील राजीव जनार्दन खरवडे यांची गावातच एक हेक्टर शेती आहे. त्यात असलेल्या घरात राहून ते शेती करीत होते १४-८-१९९० पर्यंत या शेतीच्या सातबारावर त्यांच्या आजोबांचे नाव होते. आजोबा वारल्यानंतर राजू खरवडे यांची या शेतीवर वहिवाट होती. मात्र १९९० नंतरच्या दस्तऐवजावर या सातबारावरील त्यांचे नाव जाऊन या सातबाराचा फेरफार अन्य व्यक्तींच्या नावे करण्यात आला. मात्र आपण किंवा आपल्या पूर्वजांनी ही शेती कोणालाही विकली नसल्याचे राजू खरवडे यांनी पत्र परिषदेत सांगितले. २०२१ मध्ये नायब तहसीलदारांनी ही जमीन तुमची नसल्याचे सांगून राजू खरवडे यांना जमिनीवरून हुसकावून लावले. मात्र आपण जमीन विकली नसताना सुद्धा जमिनीच्या सातबारावर अन्य व्यक्तींच्या नावे फेरफार झाला कसा यासाठी त्यांनी प्रथम तहसीलदार नंतर उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली मात्र आपल्याला न्याय मिळाला नाही व कोणत्या आधारावर फेरफार करण्यात आले याची माहिती मिळाली नाही असे त्यांनी पत्र परिषदेत सांगीतले.
0 comments:
Post a Comment