Ads

शिवसेना (उ.बा.ठा) आयोजित तलाठी पदाच्या निशुल्क टेस्ट सिरीजच्या पाचव्या टप्प्यात भद्रावती व वरोरा केंद्रावर विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भद्रावती तालुका प्रतिनिधी : हिन्दुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रिद वाक्य अंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण याच्याशी सुसंगत शिवसेना(उ. बा. ठा.) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी गावातील गोर गरीब विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत इतर मुलांच्या तुलनेत कमी पडू नये. यासाठी वरोरा व भद्रावती येथे विद्यार्थ्यानकरीता निशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन केले. यापूर्वी या परीक्षेचे चार टप्पे पार पडले. आज दि. १३ आँगस्ट रोजी पार पडलेल्या तलाठी पदाच्या निशुल्क टेस्ट सिरीजच्या पाचव्या टप्प्यात भद्रावती व वरोरा केंद्रावर विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. Spontaneous response of students at Bhadravati and Warora centers in the fifth phase of free test series for Talathi post organized by Shiv Sena (UBT).
ही परीक्षा वरोरा येथील कर्मवीर विद्यालय तसेच भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे प्रशासकिय महाविद्यालय या केंद्रावर पार पडली. शिवसेना (उ.बा.ठा.) महिला जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उप-जिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, विधानसभा समन्वयक, युवती सेना अधिकारी प्रतिभा मांडवकर यांच्या नेतृत्वात वरोरा व भद्रावती येथे सराव परीक्षेच्या पाचव्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले .
डॉ. विवेक शिंदे प्रशासकिय महाविद्यालय येथे या परीक्षा केंद्रावर परीक्षक म्हणून प्रा. अश्लेषा जिवतोडे भोयर, शिव गुडमल, स्नेहा बन्सोड, भावना खोब्रागडे, राहुल मालेकर, गौरव नागपूरे आणि महेश निखाडे यांनी जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी भद्रावती तालुकाप्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर, युवासेना सरचिटणीस येशु आरगी आणि माजी नगरसेवक प्रशांत कारेकर यांच्यासह शिवसैनिकांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
तसेच वरोरा येथील कर्मवीर विद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षक म्हणून प्रतिभा मांडवकर, प्रा. प्रिती पोहाणे, मंगेश भोयर, प्रुफुल ताजणे, शशिकांत राम, अनिल सिंग, सृजन मांढरे, स्वाती ठेंगणे, तेजस्वीनी चंदनखेडे, कार्तीक कामडे, सोनल चालेकर, निखिल मांडवकर, कार्तिक कामडे यांनी काम बघीतले. वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, सुधाकर बुरान, देविदास ताजणे, चंद्रकांत जिवतोडे, युवराज इंगळे व शिवसैनिक यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यास सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment