भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:देशात काही वर्षापासुन आदिवासी दलीत- बौद्ध-बहुजन-अपसंख्यांक बांधवावर धर्माध शक्ती कडुन अन्याय, अत्याचार होत आहेत. हया जात समुहावरील बांधवांवर होणाऱ्या घटनांवर केंद्र सरकार आळा घालु शकले नाही. त्यात प्रामुख्याने मणीपुर मधील आदिवासी कुकी समुहातील तीन महिलांची काढण्यात आलेली नग्न धिंड, भिम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या वरील प्राणघातक हमला, मध्यमप्रदेश मध्ये आदिवासी बांधवांवर घडवुन आणलेला लघवी कांड हया घटनांची योग्य ती चौकशी करून तातडीने कारवाई करण्यास केंन्द्र सरकार अपयशी ठरले आहे.
त्याच प्रमाणे मागील काही महिण्यापासुन महाराष्ट्रात सुध्दा हयाच जात समुहावर हल्ले करून हत्याकांड झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने नांदेड जिल्हयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयांची जयंती गावात साजरी केली म्हणुन अक्षय भालेराव हयांची करण्यात आलेली हत्या, बिड जिल्हयात पोलीस कोठडीत झालेले जरीन खान हत्याकांड, सांगली जिल्हयातील बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या स्वागत कमानीचा वाद, त्याच प्रकारे महाराष्ट्रातील विदर्भातील सर्व जिल्हयात दौरे करून मनोहर कुंळकर्णी (संभाजी भिडे) यांनी जाती-जातीत, धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी व्यक्तव्ये केलीत, महापुरूषा बद्दल व राष्ट्र ध्वजा बाबत केलेली वादग्रस्त विधाने आणि देशविरोध विधाने हया सर्व घटनांची सखोल चौकशी करून तातडीने योग्य ती कारवाई करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार सुध्दा अपयशी ठरलेले आहे. सभांजी भिडे यांना तर केंद्र व राज्य सरकारचेच अभय असल्याचे दिसत असुन त्याच्यावर अजुनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही..
हया सर्व घटनांचा छडा लावण्यात केंद्र सरकार व राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे हया सरकारांचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी विचार संघर्ष संघटन भद्रावती द्वारे निषेध मोर्चाचे आयोजन केलेले आहे.
हया निषेध मोर्चामध्ये बौध्द समाज संघटन, गोंड धर्मीय एकता संघटन, भद्रावती सर्व शाखीय माळी समाज संघटन, भद्रावती हजरत टिपु सुलतान युवा फाऊंडेशन भद्रावती, समस्त बौध्द विहार कमीटी, भद्रावती समस्त बौध्द महिला मंडळ भद्रावती समस्त बौध्द युवक मंडळ भद्रावती सहभागी होणार आहेत.
तरी भद्रावती शहरातील लोकशाहीला माननारी, संविधान प्रेमी, परिवर्तनवादी, मानवतावादी जनतेने या मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बौध्द समाज संघटनेचे समन्वयक डॉ. अमित नगराळे यांनी केलेले आहे.
0 comments:
Post a Comment