Ads

स्थलांतरित केलेली आंगणवाडी मिलिंद बुद्ध विहारातच सुरू करा

चंद्रपूर : मागील वीस वर्षांपासून शहरातील पठाणपुरा वार्डातील मिलिंद बुद्ध विहारात अंगणवाडी सुरू आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी पर्यवेक्षिकेच्या हेतुपुरस्सर दबावातून ही आंगणवाडी दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे परिसरातील बालकांना, स्तनदा मातांना दुसरीकडे जावे लागत असून, गैरसोय दूर करण्यासाठी मिलिंद बुद्ध विहारातच ही आंगणवाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी स्थानिक महिलांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी केली.Start the relocated Anganwadi at Milind Buddha Vihara
मिलिंद बुद्ध विहारात मागील वीस वर्षांपासून नियमित आंगणवाडी भरत असताना एकात्मिक विकास सेवा योजनेअंतर्गत असलेल्या पर्यवेक्षिका मीना गिरडकर यांनी अंगणवाडीत पोषण आहार कार्यक्रमात आलेल्या महिलांना जय भीम म्हणायचे नाही, अशा सूचना केल्या. यामुळे काही महिलांनी मीना वैरागडे यांना विरोध केला. या रागातून वैरागडे यांनी आंगणवाडीच बुद्ध विहारातून दुसरकडे स्थलांतरित करण्याची सूचना आंगणवाडीसेविकांना केली. त्यामुळे आंगणवाडी दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आली. परंतु, बुद्ध विहार परिसरातील लहान मुले आणि स्तनदा मातांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे आंगणवाडी पूर्वीच्या ठिकाणीच सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला मिलिंद बुद्ध विहार पठाणपुरा परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती हेती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment