Ads

आई - वडीलांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणारा पुत्र महान होतो : प्रा. नितेश कराळे

वरोरा /भद्रावती (जावेद शेख):सर्वसामान्य युवक -युवतींनी राजकारण, स्पर्धा परीक्षा आणि न्यायव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी. त्या त्या क्षेत्रातील उच्च कोटीची पात्रता अंगीकारली पाहिजे. जीतना बडा संघर्ष होगा ! जीत उतनी ही बडी होगी ! आपण प्रत्येकाने आई-वडिलांना आपआपले आदर्श मानले पाहीजे.आईवडीलांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणारा पुत्र महान होतो. असे प्रतिपादन वर्धा येथील वऱ्हाडी भाषेतील राज्यस्तरीय प्रसिद्ध वक्ते प्रा. नितेश कराळे यांनी केले.
स्थानिक राधा मिलन सभागृह बोर्डा चौक वरोरा येथे आज दि. ६ ऑगस्ट रोज रविवारला सकाळी अकरा वाजता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. कराळे उपस्थित विद्यार्थांना मागदर्शन करीत होते.याप्रसंगी प्रा. नितेश कराळे यांनी उपस्थित युवक -युवतींना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.नागपूरच्या जेष्ठ कवियत्री शोभा वेले लिखीत उन्माद विषमतेचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले
या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी अध्यक्षस्थानी म. रा. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण , विशेष अतिथी जेष्ठ अधिवक्ता अँड. पुरुषोत्तम सातपुते,स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना ( उ. बा. ठा. ) चे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे, आनंदवन वरोरा महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू , आचार्य ना.गो.थुटे, नागपूरच्या जेष्ठ कवियत्री शोभा वेले, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आणि ट्रस्टच्या विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे उपस्थित होत्या.
स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना ( उ. बा. ठा. ) चे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी या प्रसंगी कार्यक्रम आयोजनासंबंधी भुमिका स्पष्ट करतांना सांगितले की,शिवसेना ( उ. बा. ठा. ) च्या माध्यमातून वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात स्पर्धा परीक्षेच्या चार टेस्ट सिरीज घेण्यात आल्या. त्या सर्व विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेविषयी अधीक ज्ञान संपादित करता यावे.यासाठी प्रा. नितेश कराळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टच्या माध्यमातून श्रध्देय बाबा आमटे आरोग्य आभियान ,विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, अनाथांची आई सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना,कै. म.ना. पावडे क्रीडा स्पर्धा योजना, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना यातून विविध सामाजिक घटकांकरीता ट्रस्टच्या वतीने केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच कोरोना संक्रमण कालावधीत ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती दिली. ट्रस्ट सदैव आपल्या पाठीशी मदती करीता तत्पर राहील. गरजवंतांनी नि :संकोचपणे ट्रस्टशी संपर्क साधावा. असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी विद्यार्थांना लक्ष निर्धारित करून कठीण परीश्रम करण्याचे आवाहन केले. अँड. पुरुषोत्तम सातपुते यांनी प्रा. नितेश कराळे आणि रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्यांची प्रशंसा करीत , या उपक्रमातून विद्यार्थांच्या ज्ञानात निश्चित भर पडेल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म. रा. ग्रा.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण यांनी अध्यक्षशीय मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रा. नितेश कराळे, रविंद्र शिंदे, कवियत्री शोभा वेले आणि प्रा. धनराज आस्वले यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल देठ ,महासचिव पुरुषोत्तम चौधरी, सचिव विनोदजी पन्नासे ,कोषाध्यक्ष प्रकाश हांडे , मार्गदर्शक धर्मेश निकोसे ,सहसचिव प्रभाकर आवारी, विकी गुप्ता यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रांजली परमानंद तिराणीक हिने स्वतः रेखाटलेले चित्र प्रा. कराळे यांना भेट दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment