भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख : भारतीय संविधानाबद्दल माहिती देवून संविधानाद्वारे मिळालेल्या अधिकार व कर्तव्यांची जाणिव करून सुयोग्य नागरिक घडविण्यास मदत होईल या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहाय्यक संस्था चंद्रपूर द्वारे शिक्षण व क्रिडा क्षेत्रातील गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून व संविधानाबद्दल मार्गदर्शन करून संविधान जागर कार्यक्रम भद्रावती येथे राबविण्यात आला.
शासकिय विश्रामगृह भद्रावती येथे गुरूवारी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाला संविधान जागर उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक अशोक घोटेकर, मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूरचे प्राध्यापक संजिव खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग भद्रावती- वरोरा येथील उपविभागीय अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली शासकिय विश्रामगृह येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संविधानाबद्दल मार्गदर्शन देवून संविधान जागर कार्यक्रम राबविण्यात आला. संविधानाची उद्देशिका वाचून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी भद्रावती - वरोरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment