भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-स्वातंत्र्य दिन व भद्रावती नगरपरिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भद्रावती भूषण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक मुरलीधर पाटील गुंडावार हॉल भद्रावती येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,उपाध्यक्ष संतोष आमने, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, उपमुख्य अधिकारी गायकवाड तसेच न.प.चे सर्व सभापती पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
विशेष क्षेत्राचा भद्रावती भूषण पुरस्कार ज्येष्ठ नागरिक संघ भद्रावती यांना देण्यात आला. यावेळी अध्यक्ष मोहनदास देशमुख, सचिव काशीराम मनगटे ,सहसचिव आनंद कुटे माटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कलाक्षेत्रातील पुरस्कार ग्रामोदय संघ भद्रावतीला देण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष प्राचार्य जितेंद्र कुमार, उपाध्यक्ष विजय चंद्र प्रकाश श्रीवास्तव ,सचिव अयुब हुसेन उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रातील देण्यात आला. अध्यक्ष वामन नामपल्लीवार, उपाध्यक्ष शेखर घुमे,सचिव अशोक शेंडे, सहसचिव प्रवीण चिमूरकर व अन्य सदस्य उपस्थित होते.
विशेष योग क्षेत्रातील पुरस्कार कुमारी ज्योती देवराव देऊरकर तर विशेष योग क्षेत्रातील पुरस्कार कुमारी आकांक्षा आकाश कटलावार हिला देण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील भद्रावती भूषण पुरस्कार रचित कुंदन टोंगे याला देण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आर्शीया शेख ,भाग्यश्री निज कामे, रफ्तारा शेख, सिद्धार्थ ठावरी,इशिता दैदावर ,आर्थिका पाठक, साक्षी जुमडे, दिव्या सिंग, हरिओम राय, तनय गुंडावार, पूर्वा बांदुरकर ,दीप्ती प्रसाद, तनिष्कराज यांना देण्यात आला. नृत्याच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण याप्रसंगी करण्यात आले तसेच वर्षानिमित्त भद्रावती नगरपरिषद तर्फे भद्रावती शहर परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील एकूण बाराशे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वॉटर बॅग व पेन्सिल बॉक्स वाटप करण्यात आले. नगरपरिषद कर्मचारी रुकसाना शेख यांचा स्वच्छ दूत म्हणून इंदोर व दिल्ली दौऱ्यात निवड झाली होती .त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
नगरपरिषद भद्रावतीच्या एकूणच कार्याबाबत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आनंद व्यक्त केला. व विकास कार्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी नगर परिषद भद्रावती vv चालू असलेल्या प्रमुख कामांचा आढावा घेतला व यापुढे नगरपरिषद तर्फे जी विविध कामे करण्यात येणार आहे त्यांच्या बद्दलची माहिती दिली. मुख्याधिकारी विशाखा शेळके यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे संचालन सचिन सरपटवार व उर्मिला बोंडे यांनी केले.
0 comments:
Post a Comment