Ads

गोवंशीय जनावरांची अवैध तस्करी करणाऱ्या विरुध्द धडक मोहीम ७१ गोवंशीय मुकाट जनावराची सुटका

चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्हयातुन अवैध गोवंशाची तस्करी रोखण्यासाठी दिनांक 18/08/2023 रोजी जिल्हयात ठिकठिकाणी विशेष नाकेबंदी राबवुन केलेल्या धडक मोहिमेत पोलीस स्टेशन शेगांव (बु.), पोलीस स्टेशन कोठारी, गोंडपिपरी आणि पोंभुर्णा हद्दीत प्रभावी नाकेबंदी दरम्यान गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या एकुण 8 वाहनांविरुध्द कार्यवाही करून 4 गुन्हयाची नोंद केली असुन त्यात एकुण निग 71 सुकाट गोवंशीय जनावरांची सुटका करुन एकूण 14 आरोपीतांना अटक करण्यात आलेली
आहे. campaign against illegal traffickers of bovine animals Rescue of 71 bovine animals
1) पोलीस स्टेशन शेगाव हद्दीत वरोरा ते चिमुर रोड वरील मौजा खातोडा रोडवर नाकेबंदी दरम्यान महिन्द्रा पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 26 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जातांना व जनावरांना कोंबुन दाटीवाटीने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आरोपी नामे (1) बिलाल जाकीर कुरेशी वय 18 वर्ष रा भद्रावती (2) अब्दुल नाजीम अब्दुल कुरेशी वय 28 वर्ष ( 3 ) रितीक सावंत मेश्राम वय 23 वर्ष, (4) राजेंद्र भाऊराव सोयाम वय 55 वर्ष आणि ( 5 ) नेहाल राजेंद्र सोयाम वय 26 वर्ष चारही रा. वरोरा यांना अटक करून त्यांच्या ताब्यात महिन्द्रा पिकअप क. MH34-BG-1632 किंमत 6,00,000/- रुपये, पायलटीक करीता वापरलेली मोटार सायकल क MH34-BL-5313 किमत 30,000/- रुपये आणि 26 नग गोवंशीय जनावरे किमत 3,29,000/- रुपये असा एकुण 9,59,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

2)पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत मौजा देवई फाटा रोडवर नाकबंदी दरम्यान पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यात एकूण 18 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जात असताना मिळुन आल्याने सदर वाहन पिकअप क MH34- AK-4148 किंमत 3,00,000/- रुपये आणि 08 नग गोवंशीय जनावरे किमत 80,000/- रुपये असा एकुण 3,80,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 19 ऑगस्ट, 2023 पोलीस स्टेशन पोर्णा हद्दीत मौजा चिंतलधाबा कमारा रोडवर नाकेबंदी दरम्यान दोन बोलेरो वाहन आणि एक टाटा योध्दा वाहन असा एकुण 3 वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 27 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवून जाताना व जनावरांना कोंबुन दाटीवाटीने वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने बोलेरो वाहन क. MH33-T-3729 किंमत 8,00,000/- रुपये, एक टाटा योध्दा वाहन क MH34-BG-8978 किंमत 8,00,000/- रुपये, बोलेरो वाहन क MH32-AJ-4180 किंमत 5,00,000/- रुपये आणि 27 नग गोवंशीय जनावरे किंमत 2,70,000/- रुपये असा एकूण 26,70,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन गोडपिपरी हद्दीत मौजा विठठलवाडा ते भगाराम तळोधी रोड वर नाकेबंदी दरम्यान बोलेरो मॅक्स वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 10 नग गोदशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जाताना व जनावरांना कोंबुन दाटीवाटीने वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने आरोपी नामे (1) मधु सानप देवया रा.राजमपेठ जिमंचरीयल, (2) राजन्ना मलया कोटे वय 52 वर्ष (3) अंजी राजन्ना कोटे वय 22 वर्ष दोन्ही रा. केनेपल्ली जि. मचेरीयल. (4) परमेश मलया गोरे वय 34 वर्ष रा. लक्ष्तीपेठ जि. मंचेरीयल (5) रामन्ना नरसया मुत्ते वय 40 वर्ष रा. कॅनेपल्ली जि नवेरीयल आणि (6) राजया राजालिग गोल्ला वय 57 वर्ष रा. ईटक्याल जि. मंचरीयल यांना अटक करून त्याच्या ताब्यातील बोलेरो मॅक्स वाहन क. AP22- Y- 7491 किंमत 3,00,000/- रुपये, बोलेरो पिकअप वाहन क T519-T-3744 किंमत 300,000/- रुपये आणि 10 नग गोवंशीय जनावरे किमत 1,00,000/- रुपये असा एकूण 7,00,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन शेगांव चे ठाणेदार सपोनि अविनाश मेश्राम, पोलीस स्टेशन पोंभुर्णा चे ठाणेदार मनोज गदादे, पोलीस स्टेशन कोठारी चे ठाणेदार विकास गायकवाड, पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे ठाणेदार जिवन राजगुरु तसेच पोउपनि महेश सुरजुसे, सफी भिमराव पडोळे, पोहवा मदन येरणे, गणेश मेश्रम पोना निखील कौरासे, संतोष निशाद, पोअ प्रफुल्ल कांबळे पोलीस स्टेशन शेगांव (बु.) पोउपनि श्रीकांत कल्लेपल्लीवार, पोहवा आत्राम पोना राजकुमार चौधरी, पोअ अविनाश झाडे, अरविंद झाडे पोलीस स्टेशन पोंभुर्णा, पोहवा किशोर मांडवगडे, पोअ सचिन पोहनकर, प्रविण कडुकर, हरी नन्नावरे, अमलेश पोलीस स्टेशन कोठारी, पोअ प्रेम चव्हाण, तिरुपती गोडशलवार पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment